आपले समाजजीवन इयत्ता सहावी नागरीशास्त्र स्वाध्याय.

धडा.पहिला. आपले समाजजीवन

प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१ ) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला……….. गरज वाटली .

उत्तर: समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली .

२ ) माणसातील कलागुणाचा विकास………. होतो .

उत्तर: माणसातील कलागुणाचा विकास समजामुळे होतो .

३ ) आपल्या काही भावनिक आणि ………गरजाही असतात.

उत्तर: आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात.

प्र.२. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

१ ) आपल्या मूलभूत गरजा कोणत्या ?

उत्तर: अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मुलभूत गरजा आहेत.

२ ) आपल्याला कोणाचा सहवास आवडतो ?

उत्तर: आपल्याला कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी यांचा सहवास आवडतो.

३ ) समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते ?

उत्तर: समाजामुळे आपल्याला विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.

प्र.३. तुम्हांला काय वाटते ? दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .

१ ) समाज कसा तयार होतो ?

उत्तर: १)

समाजात स्त्री-पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान, मुले-मुली यांचा समावेश असतो. २) समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. ३) लोकांमधील परस्परसंबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण इत्यादींचा समावेश होतो. ४) माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही. तर काही समान उदिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. आपल्याला online casino deals शोधायला आवश्यक आहे का? तुमच्यासाठी आपल्या खासगी आवडत्या कॅसिनोच्या बोनस आणि प्रमोशन्सची तपासणी करण्याची सल्ला दिली जाईल. या बोनसेसच्या विविध प्रकारांची माहिती आणि तुम्ही खेळताना अधिक मूल्य मिळवू कशी, हे आमच्या विशेषज्ञांनी सांगितले आहे:

  1. Welcome Bonuses: तुम्हाला तुमच्या खात्यात नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कॅश रिवॉर्ड मिळेल. तुमच्या खेळण्याच्या सत्राच्या सुरुवाती तुमच्या बँकरोलला आरोग्यवर्धक असलेल्या रक्कमाने मिळवा. तुमच्या जमा रक्कमाच्या अंदरून तुमच्या डिपॉझिट रक्कमासह जुळविण्याची संधी आहे, ज्यातून तुम्ही तुमच्या डिपॉझिट रक्कमाच्या वर्गातून 200% पर्यंत जुळवू शकता.
  2. No Deposit Bonuses: तुम्हाला खेळण्यासाठी काही रक्कम मिळेल आणि तुम्ही कॅसिनो

२ ) समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते ?

उत्तर: समाजाचे दैनंदिन व्यवहार व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवशक्य आहे. अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे, शेतीची अवजारे करण्यासाठी संस्था निर्माण करणे, शेतीची अवजारे करण्यासाठी कारखाने बनवणे, शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका काढणे, उत्पादित मालासाठी बाजारपेठ तयार करणे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागते. थोडक्यात, अन्न, वस्त्र, निवारा व सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते.

३ ) माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते?

उत्तर: १) व्यक्तीच्या / समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूहजीवन आवशक्य आहे.२) भटक्या अवस्थेतील माणसाला स्थैर्य व सुरक्षितता नव्हती, समूहात राहिल्याने सुरक्षिततेची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. ३) समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. ४) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटू लागली. ५) त्यातून रूढ, परंपरा, नीतिमुल्ये, नियम व कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटीत व स्थिर झाले.

४ ) समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या ?

उत्तर: १) अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मुलभूत गरजा आहेत. २) समाजात व्यक्तींच्या श्रम व कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. ३) शिक्षण आणि आरोग्य सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगतो. ४) समाजात उद्योग, व्यवसायातून आपल्या गरजापूर्ण होतात. ५) आपल्यातील क्षमता-कौशल्यांचा विकास होतो. समाजात मुलभूत गरजांची पूर्तता होते. ६) सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यांदीसाठी आपण एकमेकांवर अवलंबून असतो.७) आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. त्यामुळे जर समाजव्यवस्था अस्तित्वात आली नसती तर आपल्याला वरील गोष्टींच्या अभावी अडचणी निर्माण झाल्या असत्या.

४. पुढील प्रसंगी काय कराल ?

१ ) तुमच्या मित्राची / मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे.

उत्तर: सरांची परवानगी घेऊन मैत्रिणीच्या सोबत घरी जाऊन ती शालेय वस्तू घेऊन येणार.

२ ) रस्त्यात एखादी दृष्टिहीन / दिव्यांग व्यक्ती भेटली.

उत्तर: त्या व्यक्तीला घरी जाण्यासाठी जर हवी असेल तर मदत करणार, जर त्या व्यक्तीला काही हव असेल तर ते देणार. जेवढ शक्य होईल तेवढी आम्ही मदत करणार.

उपक्रम

( १ ) शेतीची अवजारे तयार करणाऱ्या एखाद्या कारागिराची भेट घ्या . या कामात त्याला कोणाकोणाची मदत होते. याची सूची तयार करा .

( २ ) जवळच्या बँकेला भेट देऊन ती बँक कोणकोणत्या कामांसाठी कर्ज देते याची माहिती घ्या .

( ३ ) मानवाच्या मूलभूत गरजा व नवीन गरजा यांची यादी करा.

Leave a Comment