अनंत फंदी : मुख्य शाहीर मराठी नेट सेट परीक्षा

अनंतफंदी: (थोडक्यात माहिती)

जन्म : १७४४ मृत्यू : १८१९ ( वय ७५ )

आईचे नाव : राजूबाई जन्मठिकाण : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे गाव.

आडनाव: घोलप (यजुर्वेदी कौडण्य गोत्री ब्राह्मण). पूर्वजांचा गोंधळी व सराफीचा धंदा.

  • अनंत फंदी लहानपणी अतंत खोडकर होते त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना भवानीबुवा नावाच्या साधूकडे नेले . ” मुलगा अनावर आहे . उनाड मुळे सोबतीला घेऊन धिंगामस्ती घालीत असतो . लावण्या ऐकण्याचा भारी छंद . रात्री प्रहर प्रहर रात्रपर्यंत घरी येत नाही . ” अशी तक्रार केली . बाबांनी त्याला उपदेश करावा अशी त्यांनी विनंती केली . त्या बाबाने फंदीस धोंडा मारला व त्यांना कवित्व स्फुरले. अशी आख्यायिका आहे.
  • पुढे त्यांनी आपला तमाशाचा फड उभा केला . त्यांचे साथीदार मलकफंदी , रतनफंदी राघवफंदी , हे तिघेजण होते. ”
  • “मोठ्या मोठ्या राज्यामधी महशूर | जगजाहीर चारी तर्फा || होनाजी बाळा यांनी गौरव केला.
  • पुढे तामाश्याच्या धंद्याकडून ते कीर्तनाकडे वळले.
  • शृंगारिक लावण्याकडून परमार्थाकडे वळण्यास व कीर्तनाचा पेशापत्करण्यास अहिल्याबाईंचा उपदेश कारणीभूत झाला अशी आख्यायिका आहे.
  • १७९५ साली खईयाच्या स्वारी वेळी त्यांचे वास्तव्य पुण्याचा होते .” फंदी अनंत कटिबंध छंद ललकारी श्रीमंतांचे दरबारी . “ हा खर्ड्याच्या पोवाड्यामधील उल्लेख आहे .
  • सवाई माधवराव यांच्या मर्जीतील होते अस म्हटल जात .
  • “माधवनिधन काव्य ” हे काव्य दुसऱ्या बाजीरावाने अनंत फंदी कडून लिहून घेतले. ” ही कथा बाजीराव रघुनाथे | लिहून दिधली आपुल्या हाते | त्या पत्राबरहुकुम टीका येथे | कवित्व केले कवीने || “ – यावरून दुसऱ्या बाजीरावाची त्यांच्यावर किती मर्जी होती हे दिसून येते.
  • परंतु १८०६ मध्ये यशवंतराव होळकर , शिंदे यांनी हडपसरच्या लढाईत बाजीरावचा पराजय केला . त्यामुळे दुसरा बाजीराव कोकणात पाळला . पुणे प्रांतावर होळकर यांचे राज्य आले. अनंत फंदीने त्यावर एक पोवाडा रचिला “वडिलांचे हातचे चाकर त्यास न मिळे भाकर ” अशी बाजीरावांच्या निंदेचे कवने लिहू लागले.
  • ” फंदी अनंत कवनांचा सागर | अजिंक्य ज्याचा हातखंड || ” अशी होनाजीबाळाने त्यांच्यावर लावणी रचली .
  • ” पुढे मागे ऐसा नसे दुसरा | मृत्यूलोकीचा रहिवाशी || “ होनाजीबाळा यांनी अनंत फंदी यांची अशी स्तुती केली आहे .

लावणी, पोवाडे आणि फटका

१. अक्रुरा गोपि आक्रंदती

२. चंद्रावळ

३. धन्य तुझे लावण्य

४. लुंडे गुंडे हिरसे तट्टू

५. हे मूर्ख खुण तर्का

६. जमाना आला उफराटा फटका

७. शेवटचे बाजीराव

Leave a Comment