धडा: २. भारतातील आद्य नगरे -इतिहास, Bharatatil Aadya Nagare
प्र . १ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .
प्र.१. शेतीला सुरुवात झाली तेव्हा ….. भांडी घडवणे , शेती करणे ही कामे स्त्रियांची होती.
( अ ) तांब्याची
( ब ) कांस्याची
( क ) मातीची
( ड ) दगडाची
उत्तर: कांस्याची
प्र. २. लोथल हे नगर तेथील प्राचीन ……. प्रसिद्ध आहे.
(अ ) शेतीसाठी
( ब ) गोदीसाठी
( क ) कापडासाठी
( ड ) हत्यारांसाठी
उत्तर: गोदासाठी
प्र.३. हडप्पा संस्कृतीचा…. या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे.
(अ ) चीन
( ब ) ग्रीक
( क ) मेसोपोटेमिया
( ड ) इजिप्त
उत्तर: मेसोपोटेमिया
प्र.४. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर कापडात गुंडाळले जाई.
( अ ) पांढऱ्या
( ब ) काळ्या
( क ) ताबड्या
( ड ) निळ्या
उत्तर: निळ्या
प्र. २ ( अ ) योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
अ ) मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण.
( अ ) परकीय आक्रमण
( ब ) पर्यावरणाचा ऱ्हास
( क ) व्यापारातील नुकसान
( ड ) स्थलांतर
उत्तर: मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होय.
( ब ) चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
१) दिलमून – बहरीन
उत्तर: ही जोडी बरोबर आहे.
२) मकन – ओमान-इराण-बलुचिस्तानचा किनारा
उत्तर: ही जोडी बरोबर आहे
३) शोर्तुगाय – मेसोपोटेमिया
उत्तर: ही जोडी चुकीची आहे.
कारण – शोर्तुगाय – अफगाणिस्तानच्या बदक्शान प्रांतातील ही हडप्पा संस्कृतीची वसाहत आहे.
४) मेलूहा – हडप्पा संस्कृतीचा प्रदेश
उत्तर: ही जोडी बरोबर आहे.
प्र .३ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. उत्खननामध्ये सापडलेले अवशेष मोहेंजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगडी संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात .
उत्तर: १) वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सनापूर्वी १५०० च्या सुमारास झाले , असा एक प्रभावी मतप्रवाह एके काळी होता . परंतु त्याआधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती . २) इसवी सन १९ २१ मध्ये हडप्पा आणि १९ २२ मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खनने सुरू होईपर्यंत , इसवी सनापूर्वी १५०० च्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता .३) हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान ३००० ते ३५०० पर्यंत जातो .४) त्या उपखंडात अफगाणिस्तानपासून काळात भारतीय महाराष्ट्रापर्यंत आणि मकरानच्या किनाऱ्यापासून हरयाणापर्यंत १५ लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात , विकसित आणि समृद्ध नागरी ‘ हडप्पा संस्कृती ‘ नांदत होती . ५) ही संस्कृती कांस्ययुगीन होती , हे सिद्ध झाले .६)या संस्कृतीची दोन हजारांहून अधिक स्थळे उजेडात आली आहेत . ७) हडप्पा , मोहेंजोदडो , कालीबंगन , लोथल , धोलावीरा , राखीगढी यांसारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात .
२. लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते .
उत्तर: अफगाणिस्तानच्या बदक्शान प्रांतातील ‘ शोर्तुगाय ‘ ही हडप्पा संस्कृतीची वसाहत . तिथे लाजवर्दी / इंद्रनील दगडाच्या खाणी आहेत . या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या लाजवर्दी / प्रमाणावर मागणी होती . मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्ये देवी इनन्नाच्या राजवाड्यातील इंद्रनील दगड भिंती लाजवर्दीने मढवल्याची वर्णने आहेत . हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्त्व होते
३. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला.
उत्तर: १) इसवी सनापूर्वी २०००-१९०० च्या सुमाराला नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली. हडप्पा संस्कृतीची नगरे उतरणीला लागली, तेथील लोकांना स्थलांतर करणे भाग पडले. येथून उत्तर हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या लढाऊ जमातीनी नष्ट केली, असे अनुमान बांधले गेले.
२) हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे मुख्यतः व्यापाराची घसरण, हवामानातील बदल, आर्थिक समृद्धीची उडाण यांसारख्या गोष्टीच्या एकत्रित परिणामांमध्ये आहे.
३)हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला होता. कारण मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली होती. सततच्या अंतर्गत लढाया हे एक कारण त्यामागे होते त्याखेरीज पिकाऊ जमिनीचे रुपांतर खारवट जमिनीमध्ये होत जाणे हे शेतीवर अवलंबून असलेल्या मेसोपोटेमियातील संस्कृतींच्या नाशाचे प्रमुख कारण होते. त्यातून हडप्पा संस्कृतीमधून निर्वात होणाऱ्या मालाची बाजारपेठ क्षीण होत गेली.
४) पर्यावरणाचा हास हे हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे प्रमुख कारणांपैकी होते. इसवी सनापूर्वी २००० च्या सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागले, पिकाऊ जमिनींची प्रत खालावत गेली. सरस्वती नदी म्हणजेच घगर आणि हाक्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नद्या. त्यांच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे मिळालेली आहेत, याच काळात हडप्पा संस्कृतीची नगरे आणि त्यांच्या आर्थिक-सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या गाव-वसाहतींमधील परस्परसंबंधांचा समतोल ढासळला. सरस्वतीच्या खोऱ्यात घडून आलेला प्रचंड मोठा भूकंप, हे त्यामागील प्रमुख कारण होते.
५) हडप्पा नगरांच्या अवशेषांच्या वसलेल्या वसाहती नागरी हडप्पा संस्कृतीइतक्या प्रगत आणि समृद्ध नव्हत्या. शिवाय त्यांची मातीची भांडी, घरे, मृत व्यक्तींच्या अंत्यविधींच्या संदर्भातील बालीरीती यांसारख्या गोष्टीमध्ये फरक होता. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनाही स्थलांतर करावे लागले.
प्र .४ तुमचे मत नोंदवा .
१. हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव – वसाहती यांच्यात परस्परसंबंध होता .
उत्तर:नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी, नगरातील लोक भोवतालचा नैसर्गिक परिसर आणि गावं-वसाहतींवर अवलंबून असतात. हडप्पा नगरांमधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती, विविध प्रकारचे दगड आणि मौल्यवान खड़े, विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतींमधील परस्परसंबंध अवलंबून होते.
२. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासनयंत्रणा असावी .
उत्तर: व्यापारी वस्तूंचे उत्पादन, त्यांची आयात-निर्यात आणि त्यासाठी निर्माण झालेली नगरे आणि गाव- वसाहतींमधील परस्परसंबंधांचे जाळे या सर्व गोष्टींच्या व्यवस्थापनासाठी एक सुसंघटित प्रशासनयंत्रणा प्रस्थापित झालेली असणार, हे स्पष्ट आहे. नगररचना, विटा, वजने-मापे, मुद्रा, विविध वस्तूंचे आकार आणि सुशोभीकरण या सर्वच बाबतींमधले प्रमाणीकरण हे त्या प्रशासनयंत्रणेचे साक्षी आहेत.
प्र .५ हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा .
( अ ) नगररचना :
उत्तर: पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी ‘ यांसारख्या सोईंनी युक्त विशाल घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती, वीटकाम करताना अवशेष वापरलेली ‘इंग्लिश बाँड’ पद्धत (दोन उभ्या आणि दोन आडव्या विटा रचून केलेले बांधकाम – ही पद्धत भूकंप प्रवण प्रदेशात विशेष उपयोगी असते. ) उत्तम निस्सारण व्यवस्था, सार्वजनिक स्नानगृहे, नगराचे दोन किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि त्यांमधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरांसाठी उपयोग.
( ब ) समाजव्यवस्था :
उत्तर: अधिकारदर्शक सामाजिक उतरंड, विशेष कौशल्ये प्राप्त असलेल्या कारागिरांचे कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धाप्रणाली आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या वस्तू आणि वास्तू, दफनस्थळे-मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा.
( क ) शासनव्यवस्था :
उत्तर: पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण, प्रमाणीकरण : उदाहरणार्थ, विटांचा आकार १:२:४, ८च्या पटीत वाढत जाणारी वजने (अष्टमान पद्धत), ठरावीक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी; प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती.
( ड ) आर्थिक व्यवस्था :
उत्तर: व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन उदाहरणार्थ, सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोईसाठी कारागिरांच्या कार्यशाळा आणि कारागिरांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग.अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण.
उपक्रम:
आंतरजाल ( इंटरनेट ) च्या मदतीने हडप्पाकालीन नगररचना व चंदीगड शहराची नगररचना यांचा तुलनात्मक अभ्यास करून सचित्र माहिती गोळा करा .