भारतातील दुसरे नागरीकरण : इयत्ता अकरावी इतिहास

धडा ६. भारतातील दुसरे नागरीकरण

प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

१. अश्मक हा शब्द….. भाषेतील आहे.

(अ) पाली

(ब) संस्कृत

(क) अर्धमागधी

(ड) प्राकृत

उत्तर: संस्कृत

२. काशी या महाजनपदाची. …..येथे राजधानी होती.

(अ) गोरखपूर

(ब) चंदानगर

(क) राजगृह

(ड) वाराणसी 

उत्तर: वाराणसी 

३. गौतम बु‌द्धांचा जन्म…येथे झाला. 

(अ) कुशिनगर

(ब) सारनाथ 

(क) लुंबिनी

(ड) घटलीपुत्र

उत्तर: लुंबिनी

४. उत्तर पांचाल व  दक्षिण पांचाल साम्राज्याची ……नदी ही नैसर्गिक सीमा आहे.

(अ) यमुना

(ब) भागीरथी 

(क) गंगा

(ड) निरंजन 

उत्तर: भागीरथी 

(ब) ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

‘अ’ गट            ‘ब’ गट

१. कोसल       – श्रावस्ती– बरोबर जोडी आहे. 

२. अंग            – चंपा –बरोबर जोडी आहे.

३. मत्स्य        – मथुरा — ही जोडी चुकीची आहे.

उत्तर: मत्स्य – विराटनगर

४. गांधार       – तक्षशिला –बरोबर जोडी आहे.

प्र.२ योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.

गौतम बुद्धांनी ४५ वर्षे सतत भ्रमंती केली. कारण…

(अ) गुरुच्या शोधासाठी

(ब) तपश्वर्या करण्यासाठी

(क) लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी

(ड) ज्ञान मिळवण्यासाठी

उत्तर: लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी

प्र.४ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१. सोळा महाजनपदांचा उदय झाला.

उत्तर: सोळा महाजनपदांचा उदय झाला, भौगोलिक विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून जो संघर्ष झाला त्यामध्ये काही जनपदे प्रबळ ठरली.  त्यांनी जिंकून घेतलेल्या  जनपदाचा भूप्रदेश  आपल्या जनपदाला जोडण्यास सुरुवात केली. त्यांच्या सीमा विस्तारल्या आणि त्यांना महाजनपदांचे स्वरूप प्राप्त झाले. एकूण 16 महाजनपदे आहेत ती पुढील प्रमाणे:काशी, कोसल, अंग, मगध, वृज्जी किंवा वज्जी, मल्ल, चेदि, वंश किंवा वत्स,कुरू,पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक/ अस्सक, अवंती , गांधार, कंबोज.

२. भारतात दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात झाली.

उत्तर: इसवी सनपूर्व ६०० च्या सुमारास भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश ते मगधापर्यंत सोळा महाजनपदे उदयाला आलेली होती. निरनिराळे भूप्रदेश जिंकून घेऊन ते कायमस्वरूपी आपल्या राज्याला जोडून राज्यविस्तार करणे, ही संकल्पना महाजनपदांच्या उदयाच्या बरोबरीने रुजत गेली आणि महाजनपदांमधील सत्तासंघर्षाची परिणती सरतेशेवटी मगधासारख्या विशाल साम्राज्याच्या उद्यामध्ये झाली. प्राचीन भारतात पुन्हा एकदा नागरी संस्कृतीचा उदय झाला. महाजनपदांच्या राजधान्या आणि व्यापारामुळे महत्त्व पावलेली काही नगरे यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदां भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला. त्याला ‘भारतातील दुसरे नागरीकरण’ असे म्हटले जाते.

३. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना अनेक अनुयायी मिळाले.

उत्तर: वर्मधमान महावीर यांनी ३० व्या वर्षी गृहत्याग केला. त्यांना वयाच्या ४२ व्या वर्षी केवलज्ञानाची प्राप्ती झाली. यांच्या अनुयायांना “जैन” संबोधले जाते. वर्धमान महावीरांनी अर्धमागधी या लोकभाषेत उपदेश केला. त्यांनी सदाचरण आणि व्रतस्थ आयुष्याचा पुरस्कार केला सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान आणि सम्यक् चरित्र या तीन तत्त्वीवर भर दिला.

गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला त्यांना वयाच्या 35 व्या वर्षी  प्राप्ती झाली. सारनाथजवळील ‘इशिपट्टण’ येथे मृगवनामध्ये पहिला उपदेश केला. या प्रसंगाला ‘धम्मचक्कपबत्तन’ असे म्हटले जाते. पुढे ४५ वर्षे लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी सतत भ्रमंती केली. त्यांनी पाली या लोकभाषेमध्ये उपदेश केला. गौतम बु‌द्धांनी त्यांच्या उपदेशात ‘दुःख’ या मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधले. मुळात दुःख उत्पन्न का होते आणि दुःख उत्पन्नच होऊ न देण्याचा उपाय काय, या दोन गोष्टींना अनुलक्षून त्यांनी लोकांना उपदेश केला. त्यांच्या उपदेशात त्यांनी चार ‘आर्यसत्ये’ सांगितली. (१) जगात सर्वत्र दुःख आहे. (२) दुःखाचे मूळ तृष्णा आहे. (३) तृष्णेवर बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, घा विजय मिळवला की दुःखनिरोध होतो. (४) अष्टांगिक मार्ग हा दुःखनिरोधाचा मार्ग आहे.गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग : १) सम्यक् दृष्टी,२) सम्यक् संकल्प , ३) सम्यक् वाचा ,४) सम्यक् कर्मान्त ,५) सम्यक् आजीव ,६) सम्यक् व्यायाम 7)सम्यक् स्मृती ,8) सम्यक् समाधी. दोन्ही विचारसरणी वेगळी आणि दोन महात्म्ये त्यांच्या भिन्न तत्त्वज्ञानामुळेआणि लोकभाषेत आपले विचार समाजाला समजून सांगितले त्यामुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले.

.

प्र.५ पुढील संकल्पना स्पष्ट करा.

१. नास्तिक दर्शन

उत्तर: महाजनपदांच्या काळात  बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या धारणांच्या क्षेत्रात उमटणे अपरिहार्य होते. वैदिक परंपरांवर आधारलेल्या धारणांमध्ये गृहस्थजीवन, यज्ञसंस्था आणि लौकिक समृद्धी यासंबंधीचे विचार मध्यवर्ती होते. वैदिक काळाच्या शेवटी शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ, मानवाचे वैश्विक पसाऱ्यातील स्थान, मृत्यूचे रहस्य आणि मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास यांसारख्या अमूर्त गोष्टींचा विचार प्रकषने सुरू झाला. विचारमंथनातून आत्म्याचे अस्तित्व चिरंतन असते या धारणेवर आधारलेले तत्वज्ञान ते आत्म्याचे अस्तित्व नाकारणारे तत्त्वज्ञान अशा विविध प्रणाली उद‌याला आल्या. त्यांमध्ये जे अनुभवसिद्ध असते त्यालाच सत्य मानणाऱ्या आणि वैदिक धारणावर आधारलेली समाजव्यवस्था आणि कर्मकांड यांना मुळापासून नाकारणारी चार्वाक किंवा लोकायत सारखी तात्विक प्रणालीही होती, चार्वाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन असून त्याने वेदप्रामाण्य, ईस्वर आणि परलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्‌भवणारे कर्मकांड यांना विरोध केला.

२. गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग

उत्तर: गौतम बु‌द्धांनी सांगितलेले अष्टांगिक मार्ग पुढील प्रमाणे आहेत.

(१) सम्यक् दृष्टी- (निसर्गनियमाविरुद्ध काहीही घडत नाही, हे स्वीकारणे)

(२) सम्यक् संकल्प -(योग्य निर्धार)

(३) सम्यक् वाचा -(योम्ब बोलणे)

(४) सम्यक् कर्मान्त -(योग्य वर्तणूक)

(५) सम्यक् आजीव -(योग्य मागनि उपजीविका)

(६) सम्यक् व्यायाम -(अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे)

(७) सम्यक् स्मृती -चित्ताची अखंड सावधानता आणि त्यायोगे योग्य गोष्टींची स्मृती)

(८) सम्यक् समाधी -(सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणे).

अष्टांगिक मार्गालाच “मध्यम प्रतिपद” असे म्हटलेले आहे.

प्र.६ खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

महाजनपदामधील राज्यव्यवस्था खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

(अ) राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा :

राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या ‘राज्य, स्वाराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य आणि पारमेष्ट्य’ संज्ञांचा उल्लेख केला होता.

(ब) राजाची निवड

‘राजा’ हा क्षत्रिय असावा बहुदा राजपद हे वंशपरंपरेने मिळत असे परंतु याला ही अपवाद आहेत. काही वेळा राजा हा लोकांनी निवडून दिल्याचीही उदाहरणे आहेत. राजाने वाजपेय यज्ञ केल्यानंतर ‘साम्राज्य’ या पदाची त्याला प्राप्ती होते. सामर्थ्यशाली राजा त्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्व मेध यज्ञ करत असे.

(क) राजाचे अधिकार

राजाचा तत्त्वतः त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे राजा ठरवत असे. त्याच्या राज्यातील कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा अधिकार त्याला होता. असे असले तरी राजाची सत्ता पूर्णपणे अनियंत्रित नव्हती.

(ड) निर्णय प्रक्रिया

पुरोहित, सेनानी, अमात्य, ग्रामणी इत्यादींच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे. याखेरीज जनांची समिती किंवा परिषद भरत असे. त्यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क असे. समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणेही आढळतात

उपक्रम

१. जैन धर्माच्या तीर्थकरांची माहिती संग्रहित करा.

२. जातक कथांविषयी माहिती मिळवा. एखाद्या जातक कथेचे नाट्यीकरण करा.

सतत विचारलेले प्रश्न

१) कंबोज महाजनपदाची वैशिष्टय़

उत्तर: या महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधाराच्या जोडीने येतो. राजपूर (राजौरी) ही त्याची राजधानी होती. उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला होता. ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले अ‍ॅस्पासिओय (अश्वायन) हे कंबोज महाजनपदाचा भाग होते. सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये त्यांचा उल्लेख ‘अराज’ म्हणजे राजा नसलेले, म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले, असा केलेला आहे.

२) अश्मक महाजनपद किस राज्य में है
उत्तर: महाराष्ट्र (दक्षिणापथ)

३) अश्मक महाजनपद किस नदी के किनारे स्थित है
उत्तर: गोदावरी

४) अवंती हे महाजनपद सध्याच्या कोणत्या राज्यात येते
उत्तर: मध्यप्रदेश

५) अश्मक महाजनपद की राजधानी
उत्तर
: पोतन (पोतन म्हणजे बुलढाणा जिल्हातील नांदुरा होय.)

६) काशी महाजनपद
उत्तर: सोळा महाजानपदांच्या सुरुवातीच्या काळात अधिक बलशाली होते.त्याची राजधानी वाराणसी होती.

७) त्रिरत्न कोणती आहेत?
उत्तर
: सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान आणि सम्यक् चरित्र या तीन तत्त्वांना जैन धर्माची त्रिरत्त्न असे म्हणतात.

८)उत्तर भारतात किती महाजनपदे होती?
उत्तर: १५

९) महाजन पदांची संख्या किती आहे?

उत्तर: १६

Leave a Comment