धार्मिक समन्वय इयत्ता सातवी स्वाध्याय

धडा.३.धार्मिक समन्वय

प्र.१. परस्पर संबंध शोधून लिहा.

१) महात्मा बसवेश्वर: कर्नाटक, संत मीराबाई: …….

उत्तर: महात्मा बसवेश्वर: कर्नाटक, संत मीराबाई: राजस्थान


२) रामानंद: उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू: …..

उत्तर: रामानंद: उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू: बंगाल

३) चक्रधर:………, शंकरदेव: …….

उत्तर: चक्रधर: महाराष्ट्र, शंकरदेव: आसाम

प्र.२.खलील तक्ता पूर्ण करा.

संप्रदायप्रसारकग्रंथ
भक्ती चळवळसूरदास –
तुलसीदास-
कबीर-
मन्मथ-
मीराबाई-
सुरसागर
रामचरितमानस
दोहे
परमरहस्य
भक्तिगीते
महानुभाव पंथचक्रधर स्वामीचक्रधर स्वामींच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ
लीळाचरित्र- म्हाइंभट्ट
ढवळे- महदंबा
रुख्मिणीस्वयंवर- नरेंद्र
सुत्रपाठ-
दृष्टांतपाठ- केसोबास
वच्छाहरण- दामोदर पंडित
शिशुपालवध- भास्करभट्ट बोरीकर
शीख धर्मगुरुनानकगुरुग्रंथसाहिब

प्र.३. लिहते व्हा.
१) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.

उत्तर: संत कबीर भक्चती ळवळीतील एक विख्यात संत होत . त्यांनी तीर्थक्षेत्रे , व्रते , मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही . सत्यालाच ईश्वर मानले . संत कबीर सर्व मानव एक आहेत , अशी शिकवण दिली . जातिभेद , पंथभेद , धर्मभेद मानले नाहीत . त्यांना हिंदू – मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते . त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दांत फटकारले. म्हणून संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.

२) महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम.

उत्तर: महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटकमध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला, श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. ‘कायकवे कैलास’ हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. त्याचा अर्थ “श्रम हाच कैलास आहे”. आपल्या चळवळीमध्ये आणि ‘अनुभवमंटप’ या सभागृहामध्ये धर्मचर्चेत त्यांनी सर्व जातीच्या पुरुष -स्त्रीयांना सहभागी करून घेतले. त्यांनी आपली शिकवण आपल्या कन्नड लोकभाषेतून केली. यामुळे बसवेश्सवरांच्या कार्याचा समाजावर निश्चित परिणाम झाला आहे.

४. खलील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा.

उत्तर:

सूरदास, गुरुगोविंद सिंग, संत सेना, पंप, मीराबाई, मन्मथ स्वामी, पुरंदरदास, रोहिदास, रामानुज, कबीर.


उपक्रम:
सुफी संगीत परंपरेतील एखादे भजन मिळवून सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा.

Leave a Comment