डॉ . कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय

धडा. ३. डॉ.कलाम यांचे बालपण -डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

प्र .१ . चार – पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

अ ) लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत ?

उत्तर: स्वातंत्राच्या चळवळीची वाटचाल समजणे, भविष्य जाणून घेणे, चेन्नई (मद्रास) मधील सोन्याच्या भाव जाणून घेणे, हिटलर महात्मा गांधी आणि जीना यांच्या बद्दल गांभीर्याने चर्चा करणे, त्यापेक्षा जास्त पेरीयार ई.व्ही.रामस्वामी यांच्या चळवळी बद्दल जाणून घेण्याकरिता लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र वाचत असत.

आ ) लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली ?

उत्तर: शमसुद्दी हा वर्तमानपत्र वितरक होता. त्याला रोज चालत्या रेल्वेगाडीतून फेकलेले वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करण्यासाठी कुणीतरी मदतनीस हवा होता. त्याने लेखकाला मदतनीस म्हणून आपल्या सोबत घेतले. म्हणून लेखकाच्या आयुष्यातील कष्टाच्या कमाईला शमसुद्दीचा ही हातभार लागला आहे. अशी लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली.

इ ) डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले ?

उत्तर: ‘अवूल, तुला मोठे व्हायचे असेल, तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून, एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील, तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाही.’ असे डॉ .अब्दुल कलाम यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना त्यांचे वडील म्हणाले.

ई ) रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता ?

उत्तर: नवीन वातावरण आणि पन्नास हजाराच्यावर वस्ती असलेल्या या शहरात नेहमी गजबज असायची, रामेश्वर सारखा एकजिनसीपणा नव्हता, घराची ओढ अस्वस्थ करायची, तसेच आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटायची. या सर्व कारणांमुळे रामनाथपूरमला लेखकाचा जीव रमत नव्हता.

उ) दिनमणी हे कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र आहे.

उत्तर: दिनमणी तमिळ भाषेतील वर्तमानपत्र आहे.

प्र .२ . तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा .

अ ) तुम्हांला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते?

आई– माया, ममता, जिव्हाळा, सुसंस्कार.

वडील– कष्ट, धैर्य, करारीपणा, त्याग.

भाऊ– सहकार्य, प्रेम, सुरक्षा आणि समजूतदारपणा.

बहिण– प्रेम, माया व समंजसपणा.

शेजारी– शेजारधर्म व सहकार्यवृत्ती

शिक्षक– ज्ञानदान, शिस्त व प्रेमळपणा.

आ ) तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता ? वर्तमानपत्रांतील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो ? तो भाग का आवडतो ?

उत्तर: विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचं आहे.

इ ) आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हांला तिची आठवण येते ?

उत्तर: घरातील दैनंदिन कामाच्या वेळी, एकटेपणात, स्वयंपाक व जेवण करतांना, आजारपणात.

ई ) तुमच्या आई – वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?

उत्तर: विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचं आहे.

खेळूया शब्दांशी

अ) खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा .

अ) परवानगी– पर, रवानगी, वानगी, परवा, रवा, वार.

आ) हजारभर– हर, हजार, भर, रजा.

 इ) एकजिनसीपणा– एक, जिनसी, जिन,

 ई) जडणघडण– जड, जडण, घड, घडण.

आ ) खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा.

अ) वितरक– राजू हा आमच्यागावातील रेशन दुकानाचा वितरक आहे.

आ) गिऱ्हाईक– दुकानात गर्दीपाहून गिऱ्हाईक त्रस्त झाले.

इ) वर्तमानपत्र– गावातील वयस्कर मंडळी रोज वडाच्या पारावर बसून वर्तमानपत्र वाचतात.

इ ) एकखांबी तंबू– राकेशचा भाजीचा धंदा म्हणजे एकखांबी तंबू आहे.

इ)’ एकखांबी तंबू ‘ म्हणजे सर्व जवाबदारी एकाच व्यक्तीवर असणे, तसे खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठया व्यक्तीकडून माहीत करून घ्या, त्यांचा वाक्यात उपयोग करा.

अ ) कर्ताधर्ता- घरातील एकमेव कमवणारा.

उत्तर: उमेश हा त्यांच्या आई वडिलांचा एकटाच कर्ताधर्ता आधार आहे.

आ) खुशालचेंडू- चैनी माणूस.

उत्तर: पिंट्या काही कामधाम करत नाही, नुसता खुशालचेंडू आहे.

इ) लिंबूटिंबू- सामान्य माणूस.

उत्तर: क्रिकेटच्या संघामध्ये रवी अगदीच लिंबूटिंबू आहे.

ई) व्यवस्थापक- नियोजन करणारा.

उत्तर: राजीव हा हॉटेलचा व्यवस्थापक आहे.

शोध घऊया .

अ ) आंतरजालाच्या साहाय्याने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा.

अ ) पूर्ण नाव :

उत्तर: अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम

आ ) आई – वडिलांचे नाव:

उत्तर: आशियम्मा – जैनुलाब्दीन

इ ) जन्मतारीख:

उत्तर: १५ ऑक्टोंबर १९३१

ई ) जन्मगाव:

उत्तर: धनुषकोडी गाँव (रामेश्वरम, तमिलनाडु)

उ ) शिक्षण:

उत्तर: गणित, भौतिकशास्त्राची पदवी, अंतरिक्ष अभियांत्रिकीची पदवी, बी.एस्‌‍,सी ,’नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

ऊ ) भूषवलेली पदे

उत्तर: राष्ट्रपती

ए ) लिहिलेली पुस्तके

उत्तर: अग्निपंख-आत्मचरित्र(Wings Of Fire)

( आ ) तुम्हाला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषांतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा.

उत्तर:

मराठी– लोकसत्ता, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी.

गुजराती– गुजरात समाचार, संदेश, नवगुजरात समय, दिव्य भास्कर.

हिंदी– दैनिक जागर, हिंदुस्तान, प्रभात खबर, अमर उजाला.

 उपक्रम :

१ ) सीगल पक्षी नवे प्रदेश शोधतात व तेथे काही काळ वास्तव्य करतात . हे सीगल पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे . तशी खालील पक्ष्यांची वैशिष्ट्ये शिक्षकांच्या मदतीने माहीत करून घ्या व लिहा .

( अ ) फिनिक्स

( आ ) हंस

( इ ) बगळा

( ई ) गरुड

२ ) भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा . त्यांची चित्रे व माहिती यांचे तक्ते तयार करून वर्गात लावा .

उत्तर: हे विद्यार्थ्यांनी स्वताः करायचा आहे.

खाली काही सामान्यनामे , विशेषनामे व भाववाचकनामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा .

नामे – देशमुख , चांगुलपणा , कडधान्य , कळसूबाई , पर्वत , वात्सल्य , शिखर , फूल , नवलाई , आडनाव , माणुसकी , हिमालय , मुलगी , नम्रता , जास्वंद , मटकी , सविता . मुलगी , विशेषनाम सविता.

सामान्यनामे मुलगी, कडधान्य, पर्वत, शिखर, फुल, आडनाव.
विशेषनामेसविता, देशमुख, कळसुबाई, हिमालय, जास्वंद, मटकी.
भाववाचकनामेमाणुसकी, चांगुलपणा, वात्सल्य, नवलाई, नम्रता.

खालील चित्रांच्या समोर सामान्यनाम , विशेषनाम , भाववाचकनाम लिहा .

 खाली दिलेल्या वाक्यांतील अधोरेखित नामांचे ओळखा .

१. मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली .

उत्तर: मानली-विशेषनाम, मुंबई- विशेषनाम, गावी- सामान्यनाम.

२. मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर जळाली.

उत्तर: मुलांच्या-सामान्यनाम, हलगर्जीपणा-भाववाचकनाम, इस्त्री- सामान्यनाम, वायर- सामान्यनाम,

३. सुधीरला पुरणपोळी आवडते.

उत्तर: सुधीर-विशेषनाम, पुरणपोळी- विशेषनाम.

४. ताजमहालचे सौंदर्य काही निराळेच आहे.

उत्तर: ताजमहाल- विशेषनाम, सौदर्य- भाववाचकनाम.

!!धन्यवाद!!

Leave a Comment