इतिहासलेखन: भारतीय परंपरा इयत्ता दहावी इतिहास स्वाध्याय.

प्र.१. ( अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .

( १ ) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक…………. हे होत .

( अ ) अलेक्झांडर कनिंगहॅम ( ब ) विल्यम जोन्स ( क ) जॉन मार्शल ( ड ) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

उत्तर: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होत .

( २ ) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ……..यांनी केला .

( अ ) जेम्स मिल ( ब ) फ्रेडरिक मॅक्सम्युलर ( क ) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ( ड ) जॉन मार्शल

उत्तर: हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला .

( ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा .

( १ ) हू वेअर द शूद्राज – वंचितांचा इतिहास

उत्तर: ही जोडी बरोबर आहे.

( २) स्त्रीपुरुष तुलना – स्त्रीवादी लेखन

उत्तर: ही जोडी बरोबर आहे.

( ३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 – मार्क्सवादी इतिहासव

उत्तर: ही जोडी चुकीची आहे. (द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 – राष्ट्रवादी इतिहास असे आहे.)

( ४) ग्रँड डफ – वसाहतवादी इतिहास

उत्तर: ही जोडी बरोबर आहे.

प्र. २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा .

( १ ) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली .

उत्तर: १)भारतीयांनी ब्रिटीशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्रलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला. २) यामध्ये वि. दा. सावरकर यांनी लिहिलेले ‘द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स १८५७’ (१८५७ चे स्वातंत्रसमर) हे महत्वाचे पुस्तक आहे. ३)दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकरांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. ४)राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

( २) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे .

उत्तर: १)‘ बखर ‘ हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे . शूरवीरांचे गुणगान , ऐतिहासिक घडामोडी , लढाया , थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणांस बखरीत वाचायला मिळते. २) बखरींचे चरित्रात्मक , वंशानुचरित्रात्मक , प्रसंग वर्णनात्मक , पंथीय , आत्मचरित्रपर , आत्मचरित्रपर , कैफियत , पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत.३) मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. उदा ‘ ‘सभासद बखर ‘ छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर ‘ या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. ‘ होळकरांची कैफियत ‘ कैफियत ‘ या बखरीतून आपणांस होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते.

३. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा .

( १ ) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर: १) स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ हा एक प्रमुख प्रवाह आहे.२) कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. ३) मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. ४) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे. ५) मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे.६) भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब करण्याऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील. इत्यादी समावेश होतो.

( २ ) इतिहासाचार्य वि . का . राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा .

उत्तर: इतिहासलेखन , भाषाशास्त्र , व्युत्पत्ती , व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे , याचा त्यांनी पुरस्कार केला . ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने ‘ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले . त्यांतील त्याच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत . “ इतिहास म्हणजे भूतकालीन समाजांचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन . “ इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन . केवळ राजकीय घडामोडी , सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत ” , असे त्यांचे मत होते.

प्र. ४ पुढील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ‘ ए हिस्टरी ऑफ द मराठाज् ‘
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री.अ.डांगेप्रिमिटिव्ह कम्युनिझम टू सलेव्हरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्राज

प्र.४.ब) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर: १) इतिहासकार त्यांचे ग्रंथ व हेतू २) सभासद बखर-कृष्णाजी अनंत सभासद ३) राजतरंगिणी- कल्हण
४) झियाउद्दीन बरनी- तारीख-इ-फिरुजशाही ५) बाबर-तुझुक-इ-बाबरी.

प्र.५. पुढील संकल्पना स्पष्ट करा .

( १ ) प्राच्यवादी इतिहासलेखन

उत्तर: १) युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते . २) त्याबद्दल आदर , कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते . त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते .३) प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला . ४)वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता . ५) या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो – युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली गेली. ६) प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर याचा उल्लेख महत्वाचा आहे. त्याने संस्कृत भाषा ही इंडो-यूरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा होती असे म्हटले आहे. ७) प्राच्यविदयावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले.

२ ) राष्ट्रवादी इतिहासलेखन

उत्तर: १) एकोणिसाव्या -विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते. २) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली .३) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला .४) राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. ५) असे करतांना ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सा पूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले. असा आक्षेप ही घेतला गेला. ६) उदा. राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे- महादेव रानडे, वि. दा. सावरकर, रा.गो.भांडारकर, राजेंद्रलाल मिश्र, अंतर आळतेकर, राधाकुमुद मुखर्जी इत्यादी.

( ३ ) वंचितांचा इतिहास

उत्तर: १) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला ” वंचितांचा इतिहास ” असे म्हणतात. २) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. ३) इटालियन तत्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. ४) लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. ५) वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजीत गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. ६) परंतु भारतात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार मांडलेला दिसतो.

उपक्रम

पाठात उल्लेख केलेल्या विविध इतिहासकारांच्या कार्याची माहिती देणारे सचित्र हस्तलिखित आंतरजालाच्या साहाय्याने तयार करा .

Leave a Comment