इतिहासाची साधने: इयत्ता सातवी स्वाध्याय

धडा.१. इतिहासाची साधने

प्र.१. खालील चौकोनात दडलेल्या ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा.

उत्तर: ताम्रपट, शिलालेख, पोवाडे, श्लोक, गीते, दंतकथा, चित्रे, आज्ञापत्रे, बखरी, लोकगीते, खलिते इत्यादी.

प्र.२. लिहिते व्हा .

१ ) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ?

उत्तर: स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ इत्यादी बाबींचा समावेश होतो.

२ ) तवारिख म्हणजे काय ?

उत्तर: तवारिख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम.

३ ) इतिहासलेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात ?

उत्तर: इतिहासलेखनात लेखकाचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्वाची असते.

प्र.३. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा .

१ ) भौतिक साधने , लिखित साधने , अलिखित साधने , मौखिक साधने.

उत्तर: अलिखित साधने

२ ) स्मारके , नाणी , लेणी , कथा

उत्तर: कथा

३ ) भूर्जपत्रे , मंदिरे , ग्रंथ , चित्रे

उत्तर: मंदिरे

४ ) ओव्या , तवारिखा , कहाण्या , मिथके

उत्तर: तवरिखा

प्र.४.संकल्पना स्पष्ट करा .

१ ) भौतिक साधने

उत्तर: वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची “भौतिक साधने” असे म्हणतात. (उदा. किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, स्मारके इत्यादीचा समावेश होतो.)

२ ) लिखित साधने

उत्तर: त्या काळातील देवनागरी , अरेबियन , पर्शियन , मोडी आदी लिपींची वळणे , विविध भाषांची रूपे , भूर्जपत्रे , पोथ्या , ग्रंथ , फर्माने, चरित्रे , चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते . तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ , लोकजीवन , वेशभूषा , आचारविचार , सण -समारंभ यांचीही माहिती मिळते . या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. (उदा.कागदपत्रे, वंशावळी शकावली, पत्रव्यवहार, खलिते, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, बखरी, प्रवासवर्णने इत्यादीचा समावेश लिखित साधनामध्ये होतो.)

३ ) मौखिक साधने

उत्तर: लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविधपैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची “मौखिक साधने” असे म्हणतात.

प्र.५. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का ? तुमचे मत सांगा.

उत्तर: ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते कारण, १) त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते.२) अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती हे शोधावे लागते. तसेच अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. ३) लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो.४) लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो.५) समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते.६)

प्र.६. तुमचे मत लिहा .

( १ ) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.

उत्तर: शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. शिलालेख हा इतिहासलेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो . त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. (उदा. तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळाले आहेत. )

( २ ) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

उत्तर: मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. कारण, लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविधपैलू समजतात.

उपक्रम:

कोणत्याही जवळच्या वस्तुसंग्रहालयास भेट दया .
तुम्ही अभ्यासत असलेल्या कालखंडातील इतिहासाच्या साधनांची माहिती मिळवा व त्यांची नोंद उपक्रमवहीत करा.

Leave a Comment