ललित मुक्तगद्य: मराठी साहित्य सेट नेट परीक्षा.

नेट / सेट परीक्षासाठी उपयुक्त अशी मराठी ललितमुक्त गद्याची थोडक्यात माहिती.

  • ललित मुक्तगद्य’ ‘ म्हणजे ललित साहित्यातील कथा , नाटक , कादंबरी , कविता व चरित्रे – आत्मचरित्र इ . वाङ्मय प्रकारात न बसणा-यांचा समावेश हा ‘ ललितमुक्त गदय ‘ मध्ये होतो.

उदाहरणार्थ.  ललित मुक्तगद्य साहित्यात
१)लघुनिबंध २) ललित निबंध ३) प्रसंगचित्रे ४) व्यक्तिचित्रे  ५)भावचित्रे ६) प्रवासवर्णन ६) विनोदी लेखन ७) आत्मनिष्ठपर वैचारिक लेखन यांचा समावेश ललित मुक्तगद्य साहित्यात होतो.

  • ललित गद्याच्या प्रेरणेचे श्रेय ‘ विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जाते.
  • स्वातंत्र्योत्तर काळात ललित निबंध असे संबोधले जात असे . ललित गदयात प्रवास , लेख , व्यक्तिचित्रे , ललित लेख , आठवणी , अनूभव , लघुनिबंध आणि मी च्या अनुभवांचे दीर्घ लेखन इत्यादींचा विचार केला जातो.
  • वाटचाल

१९५० ते २००० या कालखंडाचे दोन भागात विभाजन केले आहे.  १)१९५० ते १९७५ आणि १९७५ ते २०००

  • पहिला कालखंड – १ ९ ५० ते १ ९ ७५

या कालखंडावर स्वातंत्र्यपूर्व काळातील लेखनाचा प्रभाव दिसतो .

स्वातंत्र्यपूर्व काळात लेखन करणारे लेखक ही १९५० नंतर लघुनिबंध शैलीमध्ये लेखन करत होते.

  • लेखकांचा आढावा पुढील प्रमाणे
  •  वि.स. खांडेकर – ( माझं चार -१९५९ )
  • ना . सी . फडके ( पडछाया ‘ – १९५६ )
  • अनंत काणेकर – ( विजेची वेल – १९५६ )
  • के.ज. पुरोहित  – ( सावळाच रंग तुझा – १९५०)
  • म.ना. अदवंत-  ( मनाचे संकल्प – १९५० , मनाची मुसाफिरी – १९५६ )
  • गो. रा . दोडके – ( गाभारा – १९६३ , नवे निबंध -१९६४  सरोजिनी बाबर – ( खुणेची पाने – १९६१ )
  • वि . पा . दांडेकर ( राजाराणी -१९५८ ) इत्यादींचा समावेश होतो.
  • स्वातंत्रोत्तर काळात आठवण – अनुभव यांच्या अनुशंगाने लेखन झालेले दिसते . त्याचा मुळस्रोत – न . वि . गाडगीळ पर्यंत पोहचविता येते.
  • न . वि . गाडगीळ – सालगुदस्त ( १९४७ ), अनगड मोती-(१९५५ )
  • ना . ग . गोरे-  सीतेचे पोहे ( १९५३ ), डाली ( १९५६ )राख आणि शिंपले ( १९६४ ).
  • गो . वि . करंदीकर  ‘ पहिला पाऊस , स्पर्शाची पालवी * आकाशाचा अर्थ या माझ्या पाऊलवाटा ‘ हे लघुनिबंध (सुचकता , प्रतिमा , प्रतीक रूपकता , उत्कटता हे गुण त्यांच्या लेखनाचे दिसतात.)
  • दुर्गा भागवत ऋतुचक्र ( १९५६ ) , भावमुद्रा ( १९६० ) व्यासपर्व ( १९६२ ) रुपरंग ( १९६७ ) पैस ( १९७० )
  • मंगेश पाडगावकर – लिंबोणीच्या झोडमागे ( १९५६ ) सुप्रसिद्ध झाला आहे .
  • माधव आचवल – ( वास्तुकला शास्त्रज्ञ )
  • किमया (१९६१) किमया मधील लेखांना वास्तुकला , शिल्पकला आणि चित्रकला यांच्या संवेदनेच्या अनुषंगाने आशाविश्व लाभले आहे .
  •   श्रीनिवास कुलकर्णी – डोह ( १९६५ )
  •   मधुकर केचे – आखरअंगर – केटचे यांच्या आठवणी अनुभव यांचे दर्शन घडविबारे पुस्तक
  • विजय तेंडुलकर – कोवळी उन्हें – (१९७१)
  • व्यंकटेश माडगुळकर- पांढऱ्यावर काळे ( १९७१ )
  • सरोजिनी वैद्य – पहाटपाणी – १९७५
  • प्रभाकर पाध्ये-  चिवाटीची फुले ( १९७८ )
  • ग . दि . माडगुळकर – ‘ मंतरलेले दिवस ‘ ( १९६२ )


१ ९७५ ते २००० मधील ललितलेखन


रा.भि. जोशी
साठवणी – ( १९७९ )
उथळ – ( १९७८ )
वाटचाल –
सोन्याचा उंबरठा- ( १ ९८४ ), घाटशिळेवरि उभी १९८४


शिरीष पै

वडिलांचे सेवेशी ( १९८७ )
पप्पा , तुम्ही म्हणजे तुम्हीच ( १ ९९ ८ )
मी माझे मला (१९९४)
माती खालची माती – ( १९६५ )


आनंद यादव –

स्पर्श कमळे १९७८
पाणभवरे ( १९८२ )


व्यंकटेश माडगूळकर –

नागाझिरा ( १९७९ )
राममेवा ( १९८४ ) हे संग्रह प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment