माहेर (कविता): मराठी इयत्ता पाचवी स्वाध्याय

माहेर (कविता)

स्वाध्याय

प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.

१)कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे?

उत्तर: कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे .

२)या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता?

उत्तर: तापी या नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकणमातीचा आहे.

३) कवितेतील स्त्री सौजीचे लाडू कशात बांधणार आहे?

उत्तर: कवितेतील स्त्री सौजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे .

४)कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे?

उत्तर: कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे माहेराला जाणार आहे.

 प्र.२. काय ते लिहा.

( अ ) ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती……

उत्तर: ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकण माती.

( आ ) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ……

उत्तर: लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजी.

( इ ) बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन……………

उत्तर: बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ.

प्र.३. चिकणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकात एक कल्पना सुचत गेल्या . त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा.

उत्तर: नदीकाठची चिकण माती पाहून माहेरवाशिणीला १)ओटा बांधूया, २)ओट्यावर जात मांडूया, ३)सोजी तरी दळूया, ४)सोजीचे लाडू बांधूया, ५)लाडू शेल्याच्या पदरी बांधूया, ६)भावाला भेटूया, ७)भाऊ रथ आणेल,९) रथाला नंदी जुपुया, १०)नंदी चागला असल्यास माहेराला जाऊया, ११) माहेर चांगल तर धिंगामस्ती करूया. अशा एकात एक कल्पना सुचत गेल्या.

उपक्रम :

१. तुमच्या परिसरातील मातीचे वेगवेगळे नमुने गोळा करा . प्रत्येक नमुन्याचे वैशिष्ट्य व उपयोग माहीत करून घ्या . वर्गात सांगा.

२. नागपंचमीची गाणी , नवरात्रीतील भोंडल्याची गाणी अशा गाण्यांचा संग्रह करा.

 खेळूया शब्दाशी.

‘ नंदी ‘ या शब्दातील ‘ न ‘ या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना , वाचताना विसरला , तर ‘ नदी हा वेगळा शब्द तयार होतो . या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो .

नंदी – नदी अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहा . त्यातील शब्दांचे अर्थ सांगा .

हे करून पाहा.

चिकणमातीपासून तुमच्या आवडीची खेळणी , किल्ला बनवा . यासाठी तुम्ही केलेल्या कृती क्रमाने सांगा.

आपण समजून घेऊया.

सर्वनाम:

 सुधीर हुशार मुलगा आहे . सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे . सुधीर सुमनला ‘ सुमा ‘ म्हणतो . सुमन सुधीरला ‘ दादा ‘ म्हणते . सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात . सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत . सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो.

 वरील परिच्छेदात सुधीर आणि सुमन या भावंडांचे वर्णन आलेले आहे . सुधीर व सुमन या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद वाचा.

 सुधीर हुशार मुलगा आहे . त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे . तो तिला ‘ सुमा ‘ म्हणतो . ती त्याला ‘ दादा ‘ म्हणते . ते एकाच शाळेत शिकतात . त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत . तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो.

 सुधीर आणि सुमन या नामाऐवजी आपण येथे ‘ त्याच्या , तो , तिला , ती , त्याला , ते , त्यांच्यात , तो , तिची ‘ असे शब्द वापरले आहेत . या शब्दांना सर्वनाम म्हणतात.

Leave a Comment