धडा.५. मानवाची वाटचाल
स्वाध्याय
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
अ ) लॅटिन भाषेत …….या शब्दाचा अर्थ आहे मानव.
उत्तर: लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव.
आ ) शक्तिमान मानव प्रामुख्याने…….मध्ये वस्ती करत होता.
उत्तर: शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये मध्ये वस्ती करत होता.
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) हात कु-हाड कोणी बनवली ?
उत्तर: हात कु-हाड ताठ कण्याच्या होमो इरेकट्स या मानवाने बनवली.
आ) आनुवांशिकता म्हणजे काय ?
उत्तर: माणसाचे रंगरूप , आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवांशिकता असे म्हणतात .
३. पुढील विधानांची कारणे लिहा .
अ) शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले .
उत्तर: शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवांच्या समूहांबरोबरचा संघर्ष , पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे, अशा काही कारणांमुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले असावे, असे मानले जाते.
आ ) बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.
उत्तर: १)बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. २) ते ध्वनीच्या बरकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते.३) त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती.४) त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.
४. पुढील शब्दकोडे सोडवा.

१)कुशल मानवाचे अवशेष कोठे सापडले?
उत्तर: कुशल मानवाचे अवशेष आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाले.
२)कुशल मानवाने तोड हत्यार बनवले?
उत्तर: कुशल मानवाने तोड दगडाची हत्यारे बनवली होती.
३)बुद्धिमान मानवाचा कोणत्या शिकारीवर भर होता?
उतर: बुद्धिमान मानवाचा प्राण्यांच्या शिकारीवर भर होता .
४)साधनांची निवड कशावर अवलंबून असते?
उत्तर: साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी उर्जा यांचा वापर. अधिकाधिक परिणामकारक वापर. परिणामकारक साधने वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य.इत्यादी