धडा .५.मुंग्यांच्या जगात
प्र .१ . एका वाक्यात उत्तरे लिहा .
( अ ) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते ?
उत्तर: कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.
(आ ) मुंग्या गंधकण केव्हा सोडतात ?
उत्तर: मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात.
( इ ) मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात ?
उत्तर: स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.
प्रश्न. २ मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात ?
उत्तर: स्वतःचे किंवा वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या कडाडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, काही विशिष्ट आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. अशा पद्धतीने मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात.
प्रश्न.३ वाक्यात उपयोग करा.
१) माग काढणे
उत्तर: मांजराने घरभर उंदराचा माग काढला.
२)सावध करणे-
उत्तर: झाडावर चढत असतांना आईने सावध केले.
३) फवारा सोडणे
उत्तर: घरातील दुर्गंध घालवण्यासाठी सुगंधी द्रवाचा फवारा मारला.
४) तत्पर असणे
उत्तर: एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असणे.
५) पळ काढणे
उत्तर: समोर कुत्रा दिसताच सोनुने पळ काढला.
६) दाह होणे
उत्तर: जखमेवर हळद लावतांना थोडा दाह होतोच.
७) हाणून पाडणे.
उत्तर: मित्रांसोबत मुंबईला जाण्याचा बेत वडिलांनी हाणून पाडला.
प्र. ४ तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते ? त्यांच्या दंशाचा माणसांवर काय परिणाम होतो ?
उत्तर: मधमाशी, डास, विंचू. १) शरीरात विष चढने. २) सूज ३)फोड येणे किंवा खाज येणे.
(आ) ‘ अन्नसाखळी ‘ म्हणजे काय ? शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: सृष्टीवरील सजीव प्राणी एकमेकांना खाऊन आपले पोट भारतात. त्याला अन्नसाखळी असे म्हणतात. उदा-गवत-अळी-कीटक-उंदीर-मुंगी-साप- गरुड अशा प्रकारे मोठे प्राणी लहान कीटक किंवा प्राण्यांना आपले भक्षण बनवतात.

(इ) मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांतून माहिती मिळवा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचं आहे.
प्र. ५ या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा.
उत्तर: आम्हाला मुंग्यांचे उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार, उद्यमशील, शिस्तबद्ध व सामाजिक जीवन जगणे. इत्यादी गुण आवडले आहेत.
प्र. ६ मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी स्वतः करायचं आहे.
प्र. ७ ‘मुंगी’ या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखादया शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा.
उत्तर: मुंगी ,मुंग्या, मुंगीला, मुंग्यांना, मुंगीच्या, मुंग्यांनी, मुंग्यांचा, मुग्यांनाच, मुंग्यांनासुद्धा.
साप, सापाने,सापांना, सापाला, सापांचा, सापांकडे,
शिक्षकांसाठी : विद्यार्थ्यांकडून पाठाचे प्रकट वाचन व मूकवाचन करून घ्यावे.
उपक्रम :
१. वेगवेगळे प्राणी , पक्षी वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांशी संवाद साधतात . संवाद साधण्यासाठी ते काय काय करतात याचे परिसरात निरीक्षण करा . तुम्ही केलेले निरीक्षण वर्गात सांगा .
उत्तर: हे विद्यार्थ्यांनी स्वतः करायचे आहे.
२. पाच कीटकांची चित्रे मिळवा . ती वहीत चिकटवा . प्रत्येक कीटकाविषयी चार – पाच वाक्यांत माहिती लिहा .
उत्तर: हे विद्यार्थ्यांनी स्वतः करायचे आहे.
३. माणसे एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी कोणकोणती माध्यमे वापरतात, याविषयी माहिती मिळवा. गटात एकमेकांना सांगा.
उत्तर: पोस्टाने पत्र, भ्रमणध्वनी (मोबाईल), Email इंटरनेट वरील सामाजिक माध्यम इत्यादी माद्यामांचा वापर करतात.
खालील वाक्यांतील नामे ओळखा व सांगा.
( अ ) बंडूची इजार चार बोटे लांब झाली.
उत्तर: इजार, बंडू, बोटे
( आ ) आईने इजार एका कोनाड्यात फेकली.
उत्तर: आई, इजार,कोनाडा.
( इ ) माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत.
उत्तर: मुंग्या, माणूस.
( ई ) आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे.
उत्तर: कविता, धावपटू , भारत.
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य नामे घाला.
अ ) …… माधवला म्हणाली.
उत्तर: आई माधवला म्हणाली.
आ ) आंब्याच्या झाडावर …….लटकत होत्या.
उत्तर: आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या.
इ ) घसरगुंडी खेळायला आम्ही …… गेलो.
उत्तर: घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो.
ई) ……….. विषय मला खूप आवडतो.
उत्तर: मराठी विषय मला खूप आवडतो.
उ ) राष्ट्रपतींचे भाषण ऐकून ……..मंत्रमुग्ध झाला.
उत्तर: राष्ट्रपतींचे भाषण ऐकून देश मंत्रमुग्ध झाला.
ऊ ) महागाई वाढल्याने …….महागल्या.
उत्तर: महागाई वाढल्याने भाज्या महागल्या.
खेळ खेळूया.
एकमेकांशी बोलताना आपण शब्दांचा वापर करतो. कधीकधी शब्दांचा वापर न करता एकमेकांशी बोलतो, तेव्हा आपण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा उपयोग करतो. कधी एकाच अवयवाचा उपयोग करतो, तर कधी दोन – तीन अवयवांचा उपयोग करतो.
उदा. मला खूप भूक लागली आहे, हे सांगताना आपण आपल्या हाताची बोटे एकत्र करून तोंडाजवळ नेतो व दुसरा हात आपल्या पोटावर ठेवतो, असा आपण मूक अभिनय करतो.
खालील वाक्ये वाचा व त्यांतील आशय न बोलता व्यक्त करा.
१. गप्प बस.
२. लिही.
३. चुकलो.
४. नको.
५. फेक.
६. आई झोपली.
७. लंगडी घाल.
८. मला लाडू आवडत नाही.
९ . होय.
१०. पाणी हवंय.
शिक्षकांनी वर्गातील विदयार्थ्यांचे दोन गट करावे. एका गटातील मुलाने वाक्य सांगावे व दुसऱ्या गटातील मुलाने त्या वाक्याच्या आशयानुसार कृती करावी. हा मूकाभिनयाचा खेळ घ्यावा.