नैसर्गिक संसाधने: हवा,पाणी आणि जमीन सामान्य विज्ञान सहावी स्वाध्याय

धडा.१.नैसर्गिक संसाधने: हवा,पाणी आणि जमीन.


प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .
अ) ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी .. किरणे शोषून घेतो .

उत्तर: ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो.

आ) पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टक्के साठा उपलब्ध आहे.

उत्तर: पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण ०.३ टक्के साठा उपलब्ध आहे.

इ) मृदेमध्ये …… व….. घटकांचे अस्तित्व असते.

उत्तर: मृदेमध्ये जैविकअजैविक घटकांचे अस्तित्व असते.

प्र.२. असे का म्हणतात?

अ) ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.

उत्तर: वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन ( 03 ) वायूचा थर आढळतो . ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे . सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात . ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो . त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते .ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे

आ) पाणी हे जीवन आहे.

उत्तर: पृथ्वीवरील सजीव प्राणी हा पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमधील रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात..


इ) समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

उत्तर: पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे. परंतु महासागरातील किंवा समुद्रातील पाणी पिण्यायोग्य नसले तरी त्यातील मासे किंवा तेल हे मानवासाठी उपयुक्त आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. पृथ्वीवर फक्त ०.३% पाणी पिण्यायोग्य आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. तरीदेखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे .


प्र.३ . काय होईल ते सांगा.
अ ) मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले.

उत्तर: मृदेच्या निर्मितीत सूक्ष्मजीव हे महत्त्वाचे घटक आहेत. कारण त्यांच्या विघटनामुळे मृदा परिपक्व होण्यास मदत होते, त्या मृदेला ‘कुथित मृदा’ असे ही म्हटले जाते. मृदेचा वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो. जमीन ही कृमी-किटकांनीयुक्त असते. त्यामुळे जर मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर मृदानिर्मितीची प्रक्रिया थांबेल.


आ) तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली.

उत्तर: जर आपल्या परिसरात वाहनांची व कारखान्यांची संख्या वाढली. तर कारखान्यांमधून/ वाहनांमधून निघणाऱ्या धुराने हवेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल. त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर पडेल हवा प्रदूषित असल्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतील.कारखान्यातील दूषित पाणी नदीत जाऊन नदीतील जलप्राणी नष्ट होतील आणि तेच पाणी भाजीपाला लोकांना पिण्यासाठी वापले तर त्याचा दुष्परिणाम मानवाच्या शरीरावर होईल.


इ) पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला.

उत्तर: पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला. तर पृथ्वीवरील सर्व सजीव नष्ट होतील. सर्व सजीव प्राणी पाण्याअभावी मरून जातील.


प्र.४. सांगा मी कोणाशी जोडी लावू ?

‘अ’ गटउत्तर‘ ब ‘ गट
कार्बन डायॉक्साइड वनस्पती व अन्ननिर्मितीमृदेची निर्मिती
ऑक्सिजनज्वलनपाऊस
बाष्पपाऊसवनस्पती व अन्ननिर्मिती
सूक्ष्मजीवमृदेची निर्मितीज्वलन

प्र.५. नावे लिहा.
अ) जीवावरणाचे भाग

उत्तर: शिलावरण, जलावरण आणि वातावरण

आ ) मृदेचे जैविक घटक

उत्तर: सुक्ष्मजीव, कृमी, कीटक इत्यादी.

इ ) जीवाश्म इंधन

उत्तर: पेट्रोल, डिझेल, रॉकेल/ केरोसीन


ई) हवेतील निष्क्रीय वायू

उत्तर: अरगॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टाँन आणि झेनॉन


उ) ओझोनच्या थरास घातक असणारे वायू

उत्तर: क्लोरोफ्लुरोकार्बन्स आणि कार्बन्स टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो.


प्र.६. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

अ) जमीन आणि मृदा ही एकच असते.

उत्तर: चूक (जमीन आणि मृदा यात फरक असतो.)


आ) जमिनीखाली असणाच्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात.

उत्तर: बरोबर


इ ) मृदेचा २५ सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्षे लागतात.

उत्तर: चूक (मृदेचा २.५ सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्षे लागतात.)


ई) रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात.

उत्तर: चूक (निऑनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात.)


प्र.७. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ) मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा.

उत्तर: जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते . मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो . ऊन , वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता , थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात . त्यांपासून खडे , वाळू , माती तयार होते . या घटकांमध्ये सूक्ष्मजीव , कृमी , कीटक आढळतात . उंदीर – घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात . तसेच जमिनीवरील झाडांची मुळेदेखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात . मृदानिर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते . परिपक्व मृदेचा २.५ सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात .


आ) पृथ्वीवर सुमारे ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते ?

उत्तर: पृथ्वीवरील सुमारे ७१% भूभाग जरी पाण्याने व्यापलेला असला तरी पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. पृथ्वीवर फक्त ०.३% पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे.


इ) हवेतील विविध घटक कोणते ? त्यांचे उपयोग लिहा.

उत्तर: हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साईड, सहा निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्व घटकांचा समावेश असतो.

त्यांचे उपयोग : नायट्रोजन: सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.
ऑक्सिजन: सजीवांना श्वसनासाठी , ज्वलनासाठी उपयोगी आहे.
कार्बन डायॉक्साइड: वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां मध्ये वापरतात.
अरगॉन – विजेच्या बल्बमध्ये वापर करतात . हेलिअम -कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो .
निऑन– जाहिरातींसाठीच्या , रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.
क्रिप्टॉन – फ्लोरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.
झेनॉन – फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो.


ई) हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत ?

उत्तर:कारण, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्वाचे आहेत. हे घटक आपल्याला नैसर्गिकरीत्या मिळाल्यामुळे त्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. मानव तसेच पृथ्वीवरील सर्वच सजीव प्राणी याच घटकांवर अवलंबून असतात म्हणून हवा, पाणी, आणि जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने आहेत.

वातावरणाचे थर कोणते ?

उत्तर: तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, दलांबर/आयनांबर, बाह्यांबर हे वातावरणाचे थर आहेत.

सतत विचारण्यात आलेले प्रश्न.

१) हवेचे मुख्य वायू घटक कोणते?
उत्तर
: नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साईड

२) हवे मध्ये कोण कोणते वायू असतात,
उत्तर
: हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साईड, सहा निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साईड इयादी वायू असतात.

३) हवा म्हणजे काय?
उत्तर
: पृथ्वीसभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय.

४) पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात?
उत्तर
: वातावरण

Leave a Comment