भारतीय साहित्यशास्त्र : सराव प्रश्नसंच नेट सेट परीक्षा-भाग -१

साहित्यशास्त्रावरील काही प्रश्न उत्तरे

१ ) भरतमूनीने कोणता ग्रंथ लिहिला ?

उत्तर: भरतमूनीने “नाट्यशास्त्र” हा ग्रंथ लिहिला .

२ ) भरताने कोणते रससूत्र सांगितले ?

उत्तर: “विभावअनुभाव व्याभिचारी संयोगाद्रसनिष्पत्ती” हे सूत्र सांगितले.

) विभावाचे प्रकार कोणते ?

उत्तर: विभावाचे आलंबन विभाव आणि उद्दिपन विभाव हे दोन प्रकार आहेत .

४ ) अनुभावाचे प्रकार कोणते ?

उत्तर: सात्त्विक, अंगिक, वाचिक, आहार्य हे अनुभवाचे प्रकार आहे.

५ ) भरतमूनीने सांगितलेले आठ रस कोणते ?

उत्तर: रौद्र, बिभत्स, करूण, भयानक, शृंगार, वीर, हास्य, अद्भुत हे आठ रस सांगितले आहेत.

) लक्षणेचे दोन प्रकार कोणते ?

उत्तर: “शुद्धा व गौणी” हे दोन लक्षणेचे प्रकार आहेत.

७) अभिधेचे प्रकार कोणते ?

उत्तर: “योग , रूढी , योगरूढी” हे अभिधेचे प्रकार आहेत.

८) गौणी लक्षणेचे दोन प्रकार कोणते ?

उत्तर: “सारोप व साध्यवसाना” हे गौणी लक्षणेचे दोन प्रकार आहेत.

९) उपादान लक्षणा दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते ?

उत्तर: उपादान लक्षणा ‘अजहल्लक्षणा’ या नावाने ओळखली जाते.

१०) लक्षण-लक्षणा दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते ?

उत्तर: लक्षण-लक्षणा “जहल्लक्षणा” या नावाने ओळखली जाते.

११)अँरिस्टॉटलने शोकात्म नाट्याची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली?

उत्तर : ‘ पोएटिक्स ‘

१२) शोकात्मनाट्य हा साहित्यप्रकार कोणत्या देशात उदयाला आला?

उत्तर : शोकात्मनाट्य हा साहित्यप्रकार ग्रीस देशात उदयाला आला.

१३) अँरिस्टॉटलने कॅथार्सिस ही संकल्पना कशातून घेतली ?

उत्तरः हिपोक्रॅटच्या वैद्यकीय ग्रंथातून घेतली.

१४) शब्द आणि अर्थ यांचे साहितत्व म्हणजे काव्य असे कोणी म्हटले आहे .

उत्तर भामह

१५ ) खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य असे कोणी म्हटले आहे .

उत्तर- रुद्रट

१६ ) कवी दण्डीने काव्याची व्याख्या कशी केली आहे .

उत्तर- इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्यशरीर अशी व्याख्या केलेली आहे .

१७) ” रीती आत्मा का व्यवस्था || ” ही व्याख्या कोणाची ?

उत्तर- ही व्याख्या कवी वामनाची आहे .

१८ ) दोषरहित , गुणयुक्त , क्वचित स्फूट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य असे कोणी म्हटले .

उत्तर- मम्मट

१९) ” रमणीयार्थ प्रातिपादनः शब्दः काव्यम् ।। ” ही व्याख्या कोणी दिली.

उत्तर- पंडित जगन्नाथ

२० ) ” अर्थ क्रियोपेतम् काव्यम् ” अशी काव्याची व्याख्या कोणी केली आहे .

उत्तर- भरतमुनी

२१) ” शब्दाथौ सहितौ काव्यम् ।। ” ही व्याख्या कोणाची ?

उत्तर भामह

२) कवी राजशेखर यांची काव्याची व्याख्या सांगा ?

उत्तर ” वाक्य रसात्मक काव्यात ”

२३ ) ” ध्वनी हाच काव्याचा आत्मा होय . ” असे कोणी म्हटले.

उत्तर: आनंदवर्धन

२४) काव्याची लक्षणे सांगा .

उत्तर- अलंकार , रिती , औचित्यविचार , वक्रोक्ति , रस , ध्वनी ही काव्याची लक्षणे आहेत .

२५) क्षेमेंद्र यांनी कोणता विचार मांडला आहे .

उत्तर औचित्यविचार क्षेमेंद्राने मांडला आहे .

२६ ) ” काव्य म्हणजे संसृतिटीका ” ही उक्ती कोणाची ?

उत्तर- मॅथ्यू अर्नोल्ड यांची होय .

२७ ) आनंदानुभूतीचे वर्णन ” ब्रम्हानंदसहोदर ” अशा शब्दात कोणी केले .

उत्तर- कवी विश्वनाथ यांनी केले आहे .

२८ ) ” प्रज्ञा नव नवोन्मेषशालीनी प्रतिभानम् ” असे कोणी म्हटले आहे .

उत्तर- भट्ट तौत यांनी म्हटले आहे .

२९ ) अभिनवगुप्ताच्या मते प्रतिभेचे सामर्थ्य कशात आहे .

उत्तर- अभिनवगुप्ताच्या मते प्रतिभेचे सामर्थ्य “ अपूर्व वस्तुनिर्माण क्षमतेत” आहे

३० ) प्रतिभेचे अलौकिकत्व कशात आहे .

उत्तर- प्रतिभेचे अलौकिकत्व तिच्या विरलत्वात आहे .

३१ ) “ अपूर्ववस्तुनिर्माणक्षम प्रज्ञा ” अशी प्रतिमेची व्याख्या कोणी केली आहे .

उत्तर- अभिनवगुप्त यांनी प्रतिभेची अशी व्याख्या केलेली आहे.

३२ ) ” अपूर्ववस्तुनिर्माणक्षम प्रज्ञा ” अशी प्रतिमेची व्याख्या कोणी केली आहे .

उत्तर- अभिनवगुप्त यांनी प्रतिभेची अशी व्याख्या केलेली आहे .

३३ ) साहित्यनिर्मितीकरीता प्रतिभेबरोबरच कोणत्या दोन महत्वपूर्ण घटकांची आवश्यकता असते .

उत्तर- बहुश्रुतता आणि अभ्यास या दोन घटकांची आवश्यकता असते

३४) ” प्रतिभा ही वेडाची बहीण आहे ” ते मत कोणी मांडले .

उत्तर- इटालियन संशोधक लोंब्रोसो याने माडले .

३५ ) प्रतिभेचे कोणते दोन प्रकार कवी दण्डीने सांगितले आहेत .

उत्तर- कवी दण्डी यांनी प्रतिभेचे नैसर्गिक आणि पूर्ववासना गुणानुबन्धि असे दोन प्रकार सांगितले आहेत .

३६) मम्मटाने प्रतिभेला काय म्हटले आहे .

उत्तर- मम्मटाने प्रतिभेला ” शक्ती ” म्हटले आहे .

३७) रुद्रटाच्या मते प्रतिभा किती आणि कोणत्या प्रकारची आहे .

उत्तर- रुद्रटाच्या मते दोन प्रकारची आहे . एक सहज व दुसरी उत्पाद्य

३८ ) प्रतिभेचा प्राण कशाला म्हटले आहे .

उत्तर प्रभावी कल्पनाशक्तीला प्रतिभेचा प्राण म्हटले आहे .

३९ ) “ कवित्वबीजरूपी विशिष्ट संस्कार म्हणजे प्रतिभाशक्ती ” असे कोणी म्हटले आहे .

उत्तर- कवी मम्मटाने म्हटले आहे .

४०) ” उत्स्फूर्त भावनांचा तीव्र आविष्कार म्हणजे काव्य अशी काव्याची व्याख्या कोणी केली

उत्तर- ही व्याख्या इंग्लिश कवी वर्डस्वर्थ यांनी केली .

४१ ) मम्मटाने काव्याची कोणती प्रयोजने सांगितली आहेत .

उत्तर- यश , कीर्ती , पैसा अशुभनिवारण , व्यवहारज्ञान आणि कांता समित उपदेश ही प्रयोजने सांगितली आहेत .

४२) डॉ. ब्रँडले यांच्या मते कलेचे प्रयोजन कोणते ?

उत्तर- डॉ . ब्रॅडले यांच्या मते आत्माविष्कार हेच कलेचे प्रयोजन होय .

४३) ” ध्वन्यालोक ” या ग्रंथाचा कर्ता कोण

उत्तर- ” ध्वन्यालोक ” या ग्रंथाचा कर्ता आंनदवर्धन आहे .

४४) शब्दाच्या तीन शक्ती कोणत्या ?

उत्तर- अभिधा , लक्षण , व्यंजना ह्या शब्दाचा तीन शक्ती आहेत.

४५) अभिधाशक्ती म्हणजे काय ?

उत्तर- एखादा शब्द उच्चारताच विशिष्ठ आकृतीची वस्तु आपल्या नजरेपुढे येते शब्दांच्या ठिकाणी ही जी शक्ती असेल ती आभिधाशक्ती होय

४६) वाच्यार्थ म्हणजे काय ?

उत्तर- अभिधाशक्तीमुळे शब्दांना जो अर्थ प्राप्त होतो तो वाच्यार्थ होय.

४७ ) लक्षणाशक्ती म्हणजे काय ?

उत्तर- एखादे वाक्य किंवा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ पटकन कळत नाही तेव्हा वेगळ्याच शक्तीचा जास्त आश्रय घ्यावा लागतो ही लक्षणा शक्ती होय.

४८) लक्ष्यार्थ म्हणजे काय ?

उत्तर- लक्षणाशक्तीने व्यक्त केलेला अर्थ म्हणजे लक्ष्यार्थ होय.

४९) व्यंगार्थ म्हणजे काय

उत्तर- वाक्यतून सूचित होणारा अर्थ म्हणजे व्यंग्यार्थ होय .

५०) व्यंजनेचे मुख्य दोन प्रकार लिहा .

उत्तर- ( अ ) शाब्दी व्यंजना ( ब ) आर्थी व्यंजना

Leave a Comment