सेट परीक्षा: मराठी पेपर २ संभाव्य उत्तरे

संभाव्य प्रश्न सप्टेंबर २०२१

१) पुढीलपैकी कोणते लेखक-कवी अनियतकालिकांच्या चळवळीतही संबंधित नव्हते ?
A)सतीश काळसेकर

B) राजा ढाले

C) वसंत गुर्जर

D) विलास सारंग


२. “समुचित” या दलित साहित्य चळवळीशी संबंधित असलेल्या नियतकालिकाचे संपादक कोण होते?

A) दिनानाथ मनोहर

B)विलास मनोहर

C)अनंत मनोहर

D) यशवंत मनोहर

३. पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते.

A) विनायक तुमराम

B) मधुकर वाकोडे

C) कृष्णमूर्ती मिरमिरा

D)सुभाष सावरकर

४. दलित साहित्य चळवळीच्या निर्मितीला कारणीभूत झालेली सर्वाधिक महत्त्वाची घटना कोणती.

A)पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना

B)आंबेडकरी जलसे

C) दलित पँथरची स्थापना

D)रिपब्लिकन पक्षाची स्थापना

५. इस 1908 सली ‘बहिष्कृत भारत’ या नावाची पुस्तिका लिहिणारा महापुरुष कोण.

A) शिवराम जानबा कांबळे

B) गोपाळबाबा वलंगकर

C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D)वि. रा. शिंदे

६. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी चळवळीचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकातून कोणी चित्रण केले आहे.

A) कविता महाजन

B) गोविंद गारे

C) गोदावरी परुळेकर

D)अहिल्या रांगणेकर

७. ‘हाकारा’ हे नियतकालिक कोणत्या चळवळीचे मुखपत्र होते.
A) जनसाहित्य चळवळ

B) दलित साहित्य चळवळ

C) ग्रामीण साहित्य चळवळ

D) आदिवासी साहित्य चळवळ

८. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षात

व्यथा माझी अशी आहे

छातीवरती बंदुक आणि

पाठीमागे दंडुक आहे

आदिवासींच्या पोलीस खेळाचे वर्णन करणाऱ्या काव्यपंक्ती कोणत्या कवियत्रीच्या आहेत.

A)उषाकिरण आत्राम

B) कुसुम आलाम

C) पुष्पा गावित

D) माहेश्वरी गावित


९. केेट मिलेट यांनी लिहलेला स्त्रीवादावरील ग्रंथ कोणता ?
A) द फेमिनाईन मेस्टिक
B) सेक्स डेस्टिनी
C) सेक्शुअल लिंगविस्टिक्स
D) सेक्शुअल पॉलिटिक्स

१०. साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगार जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी कोणती ?

A) बळी
B) पुत्र
C) शिदोरी

D) शापित

११. शेतमजुराच्या कौटुंबिक हलाखीचे प्रभावी चित्रण करणारी “रानखळगी” ही कादंबरी पुढीलपैकी कोणत्या लेखकाची आहे.
A) सदानंद देशमुख
B) भीमराव वाघचौरे
C) मोहन पाटील
D) उत्तम बावस्कर

१२. जोड्या लावा.
१) जगन्नाथ -१)रीतिरात्मा काव्यस ।
२) मम्मट – २)काव्यस्यात्मा ध्वनि: ।
३) भामह – ३)शब्दार्थो सहितौ काव्य ।
४) आनंदवर्धन -४)तददोषौ शब्दाथौ सगुणावनलंकृती पुनः क्वापि
५)रमणीयार्थ प्रतिपादक: शब्द: काव्यम।

A) 1-5, 2-4, 3-3, 4-2

B) 1-4, 2-4, 3-2, 4-1

C) 1-3, 2-2, 3-1, 4-4

D) 1-2, 2-4, 3-3, 4-1


१३. वामनाने किती रीती सांगितल्या ?
A
) तीन
B) चार
C) सहा
D) दोन

१४. रस आणि चर्वणा यांच्यामध्ये कोणते नाते आहे ?
A) कार्यकारण
B) अभिन्नत्व
C) समवाय
D) क्रियाप्रतिक्रिया

१५. भारताने किती रस मानले ?
A) चार
B) पाच
C) सहा
D) आठ

१६.मराठी भाषेतील पहिला गद्य चरित्रकार असा कोणाचा उल्लेख केला जातो.
A) एकनाथ
B) भास्करभट्ट बोरीकर
C) म्हाइंभट्ट
D) संत नामदेव

१७.संदेशनावर परिणाम करणारा भाषेतर घटक पुढीलपैकी कोणता ?
A) वाक्याची सुरावली
B) शब्दांचा क्रम
C) संदेशनाचा आशय
D) संदेशनाचे उद्दिष्ट

१८. बोहाडा हे नृत्यनाट्य असून ते खानदेश, विदर्भ, मराठवाडा या प्रदेशात सादर होते.
A) संपूर्ण विधान चूक आहे.
B) संपूर्ण विधान बरोबर आहे.
C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
D) उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध बरोबर

१९. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन पुढीलपैकी कोणाकडून केले जाते.
A) महाराष्ट्र साहित्य परिषद
B) महाराष्ट्र शासन
C) साहित्य महामंडळ
D) स्थानिक आयोजक संस्था

२०. पुढीलपैकी कोणत्या दृष्टीकोनातून पूर्वीपासून वाङ्मयेतिहास लिहिला जात आहे.
A) स्त्रीवादी

B) व्यक्तिकेंद्री
C) मार्क्सवादी
D) विद्रोही

२१. रॉयल एशियाटीक सोसायटी चे मूळ नाव काय होते ?
A) लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे
B) सोसायटी ऑफ बॉम्बे
C) टाऊन हॉल
D) रॉयल सोसायटी

२२) जागा मराठा आम जमाना बदलेगा ।
उठा है तुफान, अखिर बंबई लेकर दम लेगा । ही रचना कोणाची आहे ?
A) शाहीर अण्णाभाऊ साठे
B) शाहीर अमरशेख
C) शाहीर आत्माराम पाटील
D) शाहीर द.ना. गव्हाणकर

२३) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ?
A) दुर्गा भागवत
B) विजया राजाध्यक्ष
C) कुसुमावती देशपांडे
D) शांता शेळके

२४)पुढीलपैकी कोणत्या भाषांतरित नाटकावर मराठी लोककलांचा प्रभाव दिसून येतो.
A) ‘अजब न्याय वर्तुळाचा’- चि. त्र्यं.खानोलकर
B) झुंझारराव – गो. ब. देवल
C) विकारविलसित – गो.ग. आगरकर
D) ती फुलराणी

२५) गौरी देशपांडे यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले?
A) अरेबियन नाइट्स
B) गीतांजली
C) दि बायबल
D) गीत गोविंद

२६) वाङ्मयीन आदान-प्रदानाचा सर्वात प्रमुख आविष्कार कोणता ?
A) वाङ्मयचौर्य
B) वाङ्मयीन प्रभाव
C) भाषांतर
D) रूपांतर

२७) ‘यमुना पर्यटन’ ही पहिली भारतीय कादंबरी असली तरी ‘पहिली मराठी प्रगल्भ कादंबरी’ असे कोणत्या कादंबरीस म्हणता येईल ?
A) मंजूघोषा
B) मुक्तमाला
C) पण लक्षात कोण घेतो ?
D) शिरस्तेदार

२८) ‘ऑथेल्लो’ ह्या शेक्सपिअरच्या नाटकाचे मराठीमधील रूपांतर कोणते ?
A) ऐन वसंतात अर्ध्या रात्री
B) विकारविलसित
C) झुंझारराव
D) राजमुकुट

२९) ‘मॉरफॉलॉजी ऑफ द फोकटेल’ हा ग्रंथ कोणाचा ?
A) फॅज बोआस
B) व्लादिमीर प्रॉप
C) अँटी अर्ने
D) जेकब ग्रीम

३०) ‘रूप पाहता लोचनी’, ‘सुंदर ते द्यान’ हे रूपाचे अभंग कोणत्या कीर्तन प्रकाराच्या आरंभी म्हणण्याची प्रथा आहे ?
A) राष्ट्रीय कीर्तन
B) नारदीय कीर्तन
C) वारकरी कीर्तन
D) रामदासी कीर्तन

३१) राजाराम विठ्ठल सौंदणीकर हा कोणत्या कादंबरीचा नायक आहे ?
A) गावगुंड
B) बनगरवाडी
C) टारफुला
D) आई आहे शेतात

३२) शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर ‘साहेबराव पाटील’ ही कविता कोणत्या कवीने लिहिली आहे ?
A) इंद्रजित भालेराव
B) विठ्ठल वाघ
C) प्रकाश होळकर
D) उत्तम कोळगावकर

३३) आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनू वेधला माझा
ही आरती कोणी लिहिली ?
A) नामदेव
B) रामा जनार्दन
C) विठा रेणुकानंदन
D) जनी जनार्दन

३४) पुढीलपैकी कोणती रचना मोरोपंतांची नाही?

A) सुभद्राचंपू
B) सावित्रीगीत
C) सीतागीत
D) रुक्मिणीगीत

३५) सूर्य पाहिलेला माणूस, सापत्नेकराचे मूल, चारशे कोटी विसरभोळे, ठोंब्या या नाटकांचे लेखक कोण ?
A) अतुल पेठे
B) अभिराम भडकमकर
C) मकरंद साठे
D) श्याम मनोहर

३६) पुढीलपैकी कोणी ‘संतकवी काव्य सूची, सिद्ध केली.
A) ज. र. आजगावकर
B) ल.रा. पांगारकर
C) गो. का. चांदोरकर
D) ल. रा. नशिराबादकर

३७) वाराणसी भागीरथी |पांडुरंगी भीमरथी या काव्यपंक्तीत पांडुरंग हा शब्द पंढरीक्षेत्र या अर्थाने कोणी वापरला आहे.
A) निळोबा
B) सावता माळी
C) संत तुकाराम
D) नामदेव

३८) कुंजकूजन या कवितासंग्रहाचे कवी कोण ?
A) कुंजबिहारी
B) काव्यबिहारी
C) दत्त
D) चंद्रशेखर

३९) लोककथेच्या अभ्यासातील संप्रसारणवादी संप्रदायाचा उद्गाता कोण ?
A) अँड्यु लँग
B) एडवर्थ टायलर
C) थिओडोर बेनफे
D) जेम्स फ्रेझर

४०) ‘महासंगर’ या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत ?
A) योगीराज वाघमारे
B) अर्जुन डांगळे
C) अविनाश डोळस
D) योगेंद्र मेश्राम

४१) स्वनांची पुढीलपैकी कोणती जोडी घोष-अघोष यातील भेद दर्शवणारी आहे ?
A) /प्/,/फ्/
B) /ट्/, /त्/
C) /क्/, /ग्/
D) /य्/, /व्/

४२) पुढीलपैकी कोणत्या विषयाचा अभ्यास समाजभाषा विज्ञानात येत नाही ?
A) भाषा आणि सामाजिक भेद
B) भाषेची व्याकरणिक व्यवस्था आणि शब्दसंग्रह
C) भाषा आणि लिंगभेद
D) भाषा आणि सांस्कृतिक परंपरा

४३) भीती आणि अनुकंपा या भावनांचा निचरा झाल्यामुळे साहित्यवाचनामुळे आनंद प्राप्त होतो’ या सिद्धांताला काय म्हणतात ?

A) कॅथार्सिस

B) करुण रसविवेचन

C) भयानक रसाचे विवेचन

D) रससुत्र

४४) ‘पर्सनल एसे’ ही संज्ञा ‘लघुनिबंधा’स कोणी योजली आहे ?

A)ऑस्टीन वॉरेन

B)रेने देकार्त

C) आल्फ्रेड शुत्झ

D) चार्ल्स लँम्ब

४५) सायलेंट किलर ही कोणत्या कवीची कविता आहे ?

A)नामदेव ढसाळ

B) अरुण कोलटकर

C) जयंत पवार

D) प्रफुल्ल शिलेदार

४६) ‘बायंगी भूता’ चा असा उल्लेख पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीत आढळतो ?

A)माणूस

B) जेव्हा मी जात चोरली होती

C) आयदान

D) गिधाडे

४७) पुढीलपैकी कोणत्या नाटकावर पथनाट्याचा प्रभाव दिसून येतो ?

A)जुलूस

B) पार्टी

C) प्रतिबिंब

D) गार्बो

४८) प्रवासवर्णनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे ?

A)तपशीलवार स्थलवर्णन

B) लेखकाचे स्थलसंबद्ध अनुभव

C) नाट्यमय प्रसंग

D) लालित्यपूर्ण शैली

४९)कष्टकऱ्याच्या जीवनातील दारिद्र्य, विषमता आणि संघर्ष यांचे परिणामकारक चित्रण पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीत आढळते?

A) बनगरवाडी

B) माणूस

C) गिधाडे

D) तुही यत्ता कंची

A ) कर्तरी

५०) ‘आमच्या वर्गातील मुले गणिते सोडविण्यात अतिशय पटाईत होती.’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?

B ) कर्मणी

C ) भावे

D ) संकरप्रयोग

५१) ‘ लेखनप्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत राहते . ‘ हे मत कुणी मांडले आहे ?

A ) भालचंद्र नेमाडे

B ) अशोक केळकर

C ) रमेश धोंगडे

D ) मिलिंद मालशे

५२) वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष , लिंग , वचन यावाबतीतील अन्वय किंवा अनन्वय म्हणजे काय ?

A ) विभक्ती

B ) प्रयोग

C ) अव्यय

D ) प्रत्यय

५३) संधी आणि समास यांचा विचार व्याकरणात वेगवेगळा केला जातो , परंतु वास्तविक दोन्ही एकाच प्रकारचे असतात .

A ) संपूर्ण विधान बरोबर

B ) पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्ध चूक

C ) पूर्वार्ध चूक , उत्तरार्ध बरोबर

D ) संपूर्ण विधान चुकीचे

५४) अक्षरसंख्या , अक्षरांचा लगक्रम आणि असल्यास यतिस्थान निश्चित असलेला पद्यरचनाप्रकार पुढीलपैकी कोणता ?

A ) अक्षरगणवृत्त

B ) मात्रावृत्त

C ) छंद

D ) जाती

५५) एका भाषाकुलामध्ये कोणत्या भाषा समाविष्ट केल्या जातात ?

A ) एका भौगोलिक परिसरातील

B ) परस्परांशी दीर्घकाळ देवाणघेवाण असणाऱ्या

C ) 70 % पेक्षा अधिक शब्दसाम्य असणाऱ्या

D ) एका भाषेमधून उद्भवलेल्या

५६) बोली या प्रमाणभाषेपेक्षा शब्दसंग्रहाच्या स्तरावर वेगळ्या असतात , व्याकरणिक स्तरावर त्यांच्यात भेद दिसत नाही.

A ) संपूर्ण विधान बरोबर

B ) पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्ध चूक

C ) पूर्वार्ध चुकीचा , उत्तरार्ध बरोबर

D ) संपूर्ण विधान चुकीचे

५७) माहिती तंत्रज्ञानामुळे नव्याने आलेले साहित्यप्रसाराचे माध्यम पुढीलपैकी कोणते ?

A ) ध्वनिफिती

B ) ध्वनिचित्रफिती

C ) ई – बुक

D ) माहिती जाल

५८) तौलनिक भाषाभ्यासपद्धती ही ऐतिहासिक भाषाभ्यासपद्धतीच्या बरोबरच विकसित झाली आणि ती एकाच भाषेच्या चौकटीत अभ्यास करण्यास उपयुक्त आहे .

A ) संपूर्ण विधान बरोबर

B ) पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्ध चूक

C ) पूर्वार्ध चूक , उत्तरार्ध बरोबर

D ) संपूर्ण विधान चुकीचे

५९) ‘ भारूड ‘ या संज्ञेचा संबंध ‘ भारुंड ‘ या संस्कृत शब्दाशी कोणी जोडला आहे ?

A ) आचार्य विनोबा भावे

B ) प्रभाकर मांडे

C ) रा . चिं . ढेरे

D ) ना . गो . नांदापूरकर

६०) पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालविले जाते ?

A ) युगवाणी

B ) विशाखा

C ) अक्षरपेरणी

D ) मुक्तशब्द

६१) ” संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शाहीर अण्णाभाऊ साठे , शाहीर अमरशेख आणि शाहीर द . ना . गव्हाणकर यांना ‘ ब्रम्हा – विष्णु – महेश ‘ असे कोणी संबोधले आहे ” ?

A ) आचार्य अत्रे

B ) विंदा करंदीकर

C ) एस.एम. जोशी

D) श्रीपाद अमृत डांगे

६२) एकोणिसाव्या शतकात ‘ भारतीय साहित्य ‘ या संकल्पनेची अर्थव्याप्ती किती होती ?

A ) केवळ तत्त्वचिंतनात्मक व धार्मिक साहित्य

B ) भारतातील सर्व भाषांमधील सर्व साहित्य

C ) बहुभाषिक भारतीयांचे साहित्य

D ) संस्कृत , प्राकृत व अपभ्रंश या भाषांतील साहित्य

६३) सामाजिक दबावामुळे विद्यापीठीय अभ्यासक्रमात कोणती कविता वादविषय ठरली ?

A ) घोडा

B ) पाणी

C ) पृथ्वीचे प्रेमगीत

D ) परी

६४) महाराष्ट्रातील केवळ सगुणप्रेमी ‘ भक्त ‘ नामदेव उत्तर हिंदुस्थानात जाऊन आपल्या आध्यात्मिक साधनेत आणखी विकसित झाले आणि ‘ संत ‘ नामदेव बनून निर्गुणाची अनुभूती घेऊ लागले . ”

A ) वरील विधान पूर्णत : बरोबर आहे

B ) वरील विधानातील पूर्वार्ध बरोबर आहे ; परंतु उत्तरार्ध चूक आहे .

C ) वरील विधानातील पूर्वार्ध चुकीचा असला तरी उत्तरार्ध बरोबर आहे

D) वरील विधान पूर्णतः चुकीचे आहे

६५) ‘ कंपरेटिव्ह लिटरेचर : थिअरी अँड प्रैक्टिस ‘ या ग्रंथाचे संपादन कोणी केले ?

A ) स्वपन मजुमदार आणि अमिय देव

B ) वसंत बापट आणि चंद्रकांत बांदिवडेकर

C ) भालचंद्र नेमाडे आणि शिशिरकुमार दास

D ) अमिय देव आणि शिशिरकुमार दास

६६) केशवसुतांच्या काव्यावर पुढीलपैकी कशाचा प्रभाव असल्याचे जाणवते ?

A ) शेक्सपिअरची कविता

B ) ‘ गोल्डन ट्रेझरी ‘ या काव्यसंग्रहातील इंग्लिश रोमँटिक कवी

C ) संत नामदेवांचे अभंग ने

D ) कोंकणी लोकगीते

६७) ‘ थोर ( ग्रेट ) सांस्कृतिक परंपरेचे समर्थन मठ मंदिरे यांच्या आश्रयाने होते , तर लहान ( लिटल ) सांस्कृतिक परंपरेचे भरणपोषण ग्रामीण समुदायात होते . ‘ असे कोणी म्हटले आहे ?

A ) सी.जी. युंग

B ) वॉन फ्रान्स

C ) आर.आर. मेरट

D ) रॉबर्ट रेडफिल्ड

६८) उडिया साहित्यावरील मराठीचा प्रभाव है पुढीलपैकी कोणत्या प्रभावघटकाचे उदाहरण मानता येईल ?

A ) सामाजिक व राजकीय घटिते

B ) भाषांतर

C ) आदर्श सर्जनशीलता

D ) नावीन्याचे आकर्षण

६९ ” हात नको पायाजवळ
खांद्याबरोबर उभी राहा
समतेसाठी लदू आपण
होऊन गेलो
जरी स्वाहा ” या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ?
A ) शरणकुमार लिंबाळे

B ) अरुण काळे

C ) भुजंग मेश्राम

D ) राम दोतोंडे

७०) ” दलित आत्मकथन म्हणजे दलित आत्म्याचे कथन नव्हे , ती स्वत : च्या जीवनाची कहाणी होय म्हणूनच आत्मकथनात आत्मा आहे अशी मांडणी करणे संभ्रमाचेच ठरेल ” .

A ) संपूर्ण विधान चूक आहे

B ) संपूर्ण विधान बरोबर आहे ने

C ) विधानाचा पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्ध चूक आहे

D ) विधानाचा उत्तरार्ध बरोबर , पूर्वार्ध चूक आहे

७१) ” ग्रामीण कथेचा सगळा जिवंतपणा तिच्या बोलीशी निगडित असतो . ” हे विधान कोणाचे आहे ?

A ) नरहर कुरुंदकर

B ) वा . ल . कुलकर्णी

C ) रा . रं . बोराडे

D ) ग . ल . ढोकळ

७२) ल.रा. पांगारकर यांच्या वाङ्मयेतिहासात पुढीलपैकी कोणता दृष्टिकोन स्वीकारलेला आहे ?

A ) व्यक्तिकेंद्री

B ) राजवटकेंद्री

C ) साहित्यप्रकारकेंद्री

D ) कलाकृतीकेंद्री

७३) साहित्याचा इतिहास म्हणजे सौंदर्यनिर्मिती , सौंदर्यग्रहण व अर्थग्रहण यांची एक प्रवाही प्रक्रिया असते , हा विचार कोणी मांडला ?

A ) गो . म . कुलकर्णी

B ) अशोक केळकर

C ) गंगाधर पाटील

D ) दि . के . बेडेकर

७४) स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाङ्मयकृतीचे पुनर्वाचन व पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरते , कारण त्यातून उपलब्ध इतिहासातील घटितांचे अर्थ व त्यांची संगती बदलू शकते .

A ) संपूर्ण विधान बरोबर

B ) पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्ध चूक

C ) पूर्वार्ध चूक , उत्तरार्ध बरोबर

D ) संपूर्ण विधान चुकीचे

७५) साहित्येतिहासाचे समुचित ज्ञान का उपकारका ठरते ?

A ) साहित्याच्या मूल्यमापनासाठी

B ) साहित्याच्या आकलन – आस्वादनासाठी

C ) साहित्याची निर्मितीप्रक्रिया उमजण्यासाठी

D ) साहित्यकार व वाचकवर्ग यांच्यातील परस्परसंबंध जाणण्यासाठी

७६) ” महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रांसि राजे । जयाच्या भये व्यापिले देव लाजे ” असे महाराष्ट्राविषयीच्या अभिमानाचे उद्गार कोणी काढले आहेत ?

A ) रामदास

B ) वामन पंडित

C ) रघुनाथ पंडित

D ) मुक्तेश्वर

७७)नागदेवाचार्यांच्या संमतीने व मार्गदर्शनाने ‘ लीलाचरित्रा’तील चक्रधरांची वचने निवडून केशिराजांनी सिद्ध केलेला ग्रंथ कोणता ?

A ) दृष्टांतपाठ

B ) सूत्रपाठ

C ) मूर्तिप्रकाश

D ) पंचवार्षिक

७८) पुढील ग्रंथ कालानुक्रमे लिहा मानसपूजा , उखाहरण , चांगदेवयासष्टी , गीतार्णव

A ) चांगदेवयासष्टी , उखाहरण , गीतार्णव , मानसपूजा

B ) उखाहरण , गीतार्णव , चांगदेवयासष्टी , मानसपूजा

C ) गीतार्णव , चांगदेवयासष्टी , मानसपूजा , उखाहरण

D ) मानसपूजा , चांगदेवयासष्टी , गीतार्णव , उखाहरण

७९) ” कृषि संस्कृतीतील समाजजीवनाचे चित्रण ही ग्रामीण साहित्य चळवळीची पूर्वअट असली तरी गावगाड्यातील इतर समाजघटकांचे चित्रण त्यात वर्ण्य नव्हते . ”

A ) संपूर्ण विधान चूक

B ) संपूर्ण विधान बरोबर

C ) पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्ध चूक

D ) पूर्वार्ध चूक , उत्तरार्ध बरोबर

८०) ‘ मी उद्ध्वस्त पहाटेचा शुक्रतारा ‘ हा कवितासंग्रह कोणाचा आहे ?

A ) प्रभू राजगडकर

B ) वाल्मिक शेडमाके

C ) रा.चि.जंगले

D ) गीत घोष

८१) पुढीलपैकी कोणते अनियतकालिक होते ?

A ) आजचा सुधारक

B ) साहित्य

C ) विविधा

D ) अमृत

८२) पुढीलपैकी कोणती कादंबरी चिं . त्र्यं . खानोलकर यांची नाही

A ) स्वगत

B ) अज्ञात कबुतरे

C ) त्रिशंकू

D ) भागधेय

८३) मराठीतून रशियाची माहिती पुरवणारे ‘ रशियाचे संक्षिप्त दर्शन ‘ हे पुस्तक कोणी लिहिले ?

A ) अनंत काणेकर

B ) श्री . अ . डांगे

C ) लालजी पेंडसे

D ) न . र . फाटक

८४) पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या लेखनातून मार्क्सवादी विचारांचा आविष्कार झालेला दिसतो ?

A ) भास्कर चंदनशिव

B ) अण्णाभाऊ साठे

C ) आनंद विनायक जातेगावकर

D ) चारूतासागर

८५) कामगार रंगभूमीवर अफाट लोकप्रियता मिळवलेले ‘ देवमाणूस ‘ हे नाटक कोणाचे ?

A ) नाना कोचरेकर

B ) नरहरी साठम

C ) भार्गवराम पागे

D ) नागेश जोशी

८६) कविगत प्रतिभा हेच एकमेव काव्यकारण असते , असे मत कोणी मांडले ?

A ) जगन्नाथ

B ) दण्डी

C ) मम्मट

D ) हेमचंद्र

८७) तदितर खग भेणे वेगळाले पळाले उपवनजलकेली जे कराया मिळाले । ? स्वजन गवसला जो याजपाशी नसे तो कठीण समय येतां कोण कामास येतो ? ।। हा प्रसिद्ध श्लोक कोणाचा आहे ?

A ) मोरोपंत

B) वामन पंडित

C ) रघुनाथ पंडित

D ) श्रीधर

८८) ‘ गोरक्षसिद्धांतसंग्रह ‘ हा म.म. गोपीनाथ कवीराज यांनी संपादित केला असून , ‘ ना ‘ म्हणजे अनादिरूप तत्त्व आणि ‘ थ ‘ म्हणजे त्रिभुवनाची स्थापना करणारा अशी नाथ या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे .

A ) संपूर्ण विधान बरोबर

B ) संपूर्ण विधान चूक

C ) पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्थ चूक

D ) उत्तरार्ध बरोबर , पूर्वार्ध चूक

८९) वीरशैव तत्त्वज्ञानाची समन्वयात्मक भूमिका मांडणारा रेणूकाचार्य लिखित ग्रंथ कोणता ?

A ) अनुभवसूत्र

B ) सिद्धांतशिखामणी

C ) शैवसिद्धप्रमानु

D ) बसवपुराण

९०) ज्ञानेश्वरीत गुप्त राहिलेले ज्ञानेश्वरांचे अभिप्राय नाथांनी आपल्या भागवतात विशद करून दाखविले आहेत . दोन्ही ग्रंथ मिळून एकच ग्रंथ आहे इतकी त्यात एकात्मता आहे . ” हे विधान कोणी केले आहे ?

A ) भा . श्री . परांजपे

B ) अ . ना . देशपांडे

C) ल . रा . पांगारकर

D ) ज . रा . आजगावकर

९१) ‘ सार्वत्रिक निकषांची आकांक्षा धरणारा व यथोचित शब्दांतून प्रकट होणारा साहित्य / साहित्यकृतीविषयीचा रसिकाचा जो ज्ञानगर्भ व मूल्यगर्भ अभिप्राय / प्रतिसाद त्याला साहित्यसमीक्षा म्हणता येईल ‘ ही व्याख्या कोणी केली आहे?

A ) गंगाधर पाटील

B ) म . सु . पाटील

C ) हरिश्चंद्र थोरात

D ) नरहर कुरुंदकर

९२) ‘ कादंबरी’च्या संदर्भात ‘ बहुआवाजीपणा ‘ ही संकल्पना कोणी योजली आहे ?

A ) सुझान लँगर

B ) एडमंड हुसेर्ल

C ) मिखाइल बाख्तिन

D ) रोमान इनगार्दैन

९३) तुकारामांच्या अभंगांची शैलीवैज्ञानिक समीक्षा न कोणी केली आहे ?

A ) दिलीप चित्रे

B ) अशोक केळकर

C ) रमेश धोंगडे

D ) दिलीप धोंडगे

९४) ‘ कविता ‘ म्हणजे प्रतिमांची सेंद्रिय रचना असते. हे विधान कोणत्या समीक्षापद्धतीचे निदर्शक आहे ?

A ) आस्वादक

B ) रूपवादी

C ) आदिबंधात्मक

D ) शैलीवैज्ञानिक

९५) भरतमुनींच्या ‘ नाट्यशास्त्रा’त ‘ नाटका’शी संबंधित किती रूपकप्रकार सांगितले आहेत ?

A ) दहा

B ) आठ

C ) पाच

D ) बारा

९६) ‘ गर्भनाटक ‘ या नाट्यांतर्गत क्लृप्तीचा वापर पुढीलपैकी कोणत्या नाटकात केला आहे ?

A ) अवघ्य

B ) आत्मकथा

C ) शांतता ! कोर्ट चालू आहे

D ) बेगम बर्वे

९७) गोष्ट ( स्टोरी ) आणि कथानक ( प्लॉट ) – यांमधील रूपभेद कोणी स्पष्ट केला आहे ?

A ) इ . एम . फॉर्टर

B ) अरिस्टॉटल

C) मिखाइल बाख्तिन

D ) इयाक डेरिडा

९८) ‘ कथे’तील ना . सी . फडकेप्रणीत तंत्रवादाला नकार देणारे कथाकार कोण होते ?

A ) वि . वि . बोकील

B ) गो . ना . दातार

C ) य . गो . जोशी

D ) वि . सी . गुर्जर

९९) ‘ लिरिक इन्टेन्सिटी ‘ हा शब्दप्रयोग कोणी केला आहे ?

A ) हर्बर्ट रीड

B ) इम्मॅन्युएल कांट

C ) एडगर अँलन पो

D ) कोलरिज

१००) ‘ या देशाचे मूळ रहिवासी हे क्षत्रिय आहेत ‘ असे आपल्या लिखाणातून वारंवार मांडणारे लेखक कोण ?

A ) रामचंद्रपंत अमात्य

B ) म . फुले

C ) कृष्णाजी अनंत सभासद

D ) प्रभाकर

Leave a Comment