धडा.२. शिवपूर्वकालीन भारत
स्वाध्याय
१. नावे सांगा.
( १ ) गोंडवनची राणी
उत्तर: राणी दुर्गावती.
( २ ) उदयसिंहाचा पुत्र
उत्तर: महाराणा प्रताप.
( ३ ) मुघल सत्तेचा संस्थापक
उत्तर: बाबर
( ४ ) बहमनी राज्याचा पहिला सुलतान
उत्तर: हसन गंगू
( ५ ) गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल
उत्तर: खालसा दल
प्र.२. गटात न बसणारा पर्याय निवडा .
( १ ) सुलतान मुहम्मद , कुतुबुद्दीन ऐबक , मुहम्मद घोरी , बाबर
उत्तर: बाबर
( २ ) आदिलशाही , निजामशाही , सुलतानशाही , बरिदशाही
उत्तर: सुलतानशाही
( ३ ) अकबर , हुमायून , शेरशाह , औरंगजेब.
उत्तर: शेरशाह
प्र.३. थोडक्यात उत्तरे लिहा .
( १ ) विजयनगर व बहमनी ही दोन राज्य का उदयास आली ?
उत्तर: महमूद गावान नंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी निर्माण झाली. विविध प्रांतातील अधिकारी आपापल्या वृतीने वागू लागले. त्यामुळे बहामनी राज्याचे विघटन झाले. बहामनी राज्याची ( १) इमादशाही २) बरीदशाही ३)आदिलशाही ४) निजामशाही ५) कुतुबशाही ) अशी पाच शकले निर्माण झाली.
( २ ) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या ?
उत्तर: महमूद गावनने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले . सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली . सैन्यामध्ये शिस्त आणली . जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली . बिदर येथे अरबी व फारसी विक्ष्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. अशा प्रकारच्या सुधारणा केल्या.
( ३ ) मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले ?
उत्तर: औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला . मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले . गदाधरसिंह याच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले . लाच्छित बडफूकन या सेनानीने मुघलांविरुध तीव्र संघर्ष केला . आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.
प्र.४. तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा .
( १ ) कृष्णदेवराय
उत्तर: कृष्णदेवराय इ.स.१५०९ मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले . बहमनी सुलतान महमूदशाह नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव कृष्णदेवराय केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. इ.स .१५३० मध्ये त्याचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता . त्याने तेलुगु भाषेमध्ये ‘आमुक्तमाल्यदा’ हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला . त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले . कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली.
( २ ) चांदबिबी
उत्तर: चांदबीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशाहाची मुगली आहे. तिने इ.स. १५९५ मध्ये मुघलांनी अहमदनगरच्या निजामशाहीवर हल्ला केला होता त्यावेळी तिने किल्ला लढवला होता परंतु त्यावेळी निजामशाहीच्या सरदारांमध्ये दुही निर्माण झाली त्या दुहीमध्ये तिला ठार मारले गेले.
( ३ ) राणी दुर्गावती
उत्तर: कचंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली . उत्तम रीतीने राज्यकारभार मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुध्द लढतांना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही.
प्र.५.सकारण लिहा
( १ ) बहमनी राज्याची पाच शकले झाली .
उत्तर: कारण, बहमनी सरदारांमध्ये गटबाजी निर्माण झाली आणि त्यामुळे बहमनी राज्याची पाच शकले निर्माण झाली ती पुढील प्रमाणे ( १) इमादशाही २) बरीदशाही ३)आदिलशाही ४) निजामशाही ५) कुतुबशाही ) अशी पाच शकले निर्माण झाली.
( २ ) राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला .
उत्तर: बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात पानिपत येते लढाई झाली त्यालाच ‘पानिपतची पहिली’ लढाई म्हणतात.त्या लढाई मध्ये बाबर विजयी झाला. या लढाईनंतर मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले . बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.
( ३ ) राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले .
उत्तर: उदयसिंहाच्या मृत्यूनतर महाराणा हे मेवाडच्या गादीवर आले . मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले.
( ४ ) औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.
उत्तर: औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध गुरुतघबहाद्दर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे त्यांना कैद करून त्यांचा इ.स. १६७५ मध्ये शिरच्छेद करण्यात आला..
( ५ ) राजपुतानी मुघलाविरुद्ध संघर्ष केला .
उत्तर: राणा जयवंतसिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबने मारवाड हे मुगल साम्राज्यास जोडून घेतले. औरंगजेबाच्या या सत्तेस मोडण्यासाठी दुर्गदास राठोड याने मारवडच्या गादीवर अल्पवयीन अजितसिंग याला बसवले. दुर्गदास चा प्रतिकार मोडण्यास औरंगजेबने राजपूत अकबरला पाठवले परंतु तो राजपुतांशी मिळला व विरोध पत्करला. मारवाडच्या अस्तित्वासाठी दुर्गादासने मुघलांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला.
प्र.६. कालरेषा पूर्ण करा .

प्र.७. इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा .
उपक्रम:
पाठांत आलेल्या व्यक्तींविषयीची अधिक माहिती संदर्भ पुस्तके , इंटरनेट , वृत्तपत्रे इत्यादींच्या साहाय्याने मिळवा . उपक्रमवहीत चित्र – माहितीचे कोलाज तयार करा व इतिहास कक्षात त्याचे प्रदर्शन भरवा.