शिवपूर्वकालीन महाराष्ट्र इयत्ता सातवी स्वाध्याय

धडा.४. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र


प्र.१. खलील तक्ता पूर्ण करा.

गाव / मौजकसबापरगणा
कशास म्हणतातजिथे लोकांची कमी वस्ती त्याला गाव/ मौजा असे म्हणत. गावापेक्षा मोठे / कसबा हे मोठेखेडेगावच असे. उदा. तालुकाच ठीकाण.अनेक गाव मिळून परगणा तयार होतो. उदा. जिल्हा
पदाधिकारीगावचा प्रमुख पाटील/ महसूल नोंद कुलकर्णी करत असे. शेट/महाजन हे वतनदार कारभारी असत.देशमुख/देशपांडे हे परगणाचे वतनदार अधिकारी.
उदाहरणवडगाव.वाई कसबा, इंदापूर कसबा.पुणे परगणा, चाकण परगणा



प्र.२. म्हणजे काय ?
( १ ) बुद्रुक

उत्तर: दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्यासाठी बुद्रुक आणि खुर्द या नावांचा वापर केला जातो. मुळगाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द .

( २ ) बलुतं

उत्तर: गावांमध्ये वेगवेगळे कारागीर असत. त्यांचे व्यवसाय वंशपरंपरेने चालत असत. गावात कारागिर जी सेवा दते असे त्याला त्या बदल्यात शेतकऱ्यांकडून शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे. त्यास बलुतं असे म्हणत.

( ३ ) वतन

उत्तर: वतन हा अरेबिक शब्द आहे. महाराष्ट्रात हा वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरतात.


प्र.३.शोधून लिहा.


१ ) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक

उत्तर: कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून सिद्दी लोक आलेली होती.


( २ ) अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार-

उत्तर: ‘संत ज्ञानेश्वर’ अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार होय.


( ३ ) संत तुकारामांचे गाव

उत्तर: संत तुकाराम पुण्याजवळील देहू गावचे आहेत.

( ४ ) भारुडाचे रचनाकार

उत्तर: संत एकनाथ हे भारुडाचे रचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.


( ५ ) बलोपासनेचे महत्त्व सांगणारे

उत्तर: रामदास स्वामी यांनी बलोपासनेचे महत्त्व सांगितले.

( ६ ) स्त्री संतांची नावे

उत्तर: संत जनाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत निर्मळाबाई इत्यादी.

प्र.४. तुमच्या शब्दांत माहिती व कार्य लिहा .
( १ ) संत नामदेव

उत्तर: १)संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ट संत व कुशल संघटक होते. २)ते उत्तम कीर्तनकार होते व कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात समानतेची भावना निर्माण केली. ४) ‘नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जागी |’ ही त्यांची प्रतिज्ञा होय. ६) संत नामदेवांची अभंगरचना प्रसिद्ध आहे. ७) त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाब पर्यंत केला. ८) त्यांनी लिहिलेली पदे आज ही शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहिब’ या ग्रंथात आहे. ९) त्यांनी संत चोखामेळा यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारसमोर बांधली.

( २ ) संत ज्ञानेश्वर

उत्तर: संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील विख्यात संत होत. त्यांनी ‘भगवद्गीता’ या संस्कृत ग्रंथाचा अर्थ सांगणारा ‘भावार्थदीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ रचला. आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सर्व सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला.अमृतानुभव, चांगदेवपासष्टी यासारखे ग्रंथ देखील लिहिले. त्यांचे ‘पसायदान’ हे उदात्त संस्कार करणारे आहे. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली.
( ३ ) संत एकनाथ

उतर: संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत . त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे . त्यात अभंग , गौळणी , भारुडे इत्यादींचा समावेश होतो . त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे . भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने सत एकनाथ लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे . त्यांनी भागवत या सस्कृत ग्रथाच्या भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला . त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे . परमार्थप्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही , हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले . ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते . आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत . ‘ संस्कृत वाणी देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली ?
( ४ ) संत तुकाराम

उत्तर: संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे. त्यांची ‘अभंगगाथा’ हि मराठी साहित्याचा एक अमोल ठेवा आहे. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली. समाजातील काहीकर्मठ लोकांनी त्यांच्या लोकजागृतीला विरोध केला परंतु त्यांनी आपल्या विचारांप्रमाणे गावातील कर्ज म्हणून जमीनी त्यांच्या कडे ठेवलेली कागदे त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. रंजल्यागांजल्यामध्ये देव पाहावा असे म्हंटले आहे. संत तुकारामाचे शिष्य व सहकारी विविध जाती-जमातीचे होते. जसे नावजा माळी, गवनरशेट वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजीपंत कुलकर्णी इत्यादी.

प्र.५ दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते.
उत्तर
: शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे जर पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. त्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढत . लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्कील होई . जनावरांना चारा मिळत नसे . पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई . लोकांना गावात राहणे कठीण होई . लोक गाव सोडत . लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. यामुळेच दुष्काळ हे रयतेला सर्वांत मोठे संकट वाटे .

उपक्रम:

१ ) वारकऱ्यांच्या दिंडीला आपण कशाप्रकारे मदत कराल , त्याचे नियोजन लिहा .

२ ) विविध संतांची वेशभूषा करून त्यांच्या काव्यांचे सादरीकरण करा .

Leave a Comment