स्वराज्यस्थापना: इयत्ता सातवी स्वाध्याय

स्वाध्याय

धडा.५. स्वराज्यस्थापना

प्र.१ . गटात न बसणारा शब्द शोधा .

( १ ) पुणे , सुपे , चाकण , बंगळूरू

उत्तर: बंगळूरू

( २ ) फलटणचे जाधव , जावळीचे मोरे , मुधोळचे घोरपडे , सावंतवाडीचे सावंत

उत्तर: फलटणचे जाधव

( ३ ) तोरणा , मुरुंबदेव , सिंहगड , सिंधुदुर्ग

उत्तर: सिंधुदुर्ग

प्र.२ . लिहिते होऊया !

( १ ) शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा.

उत्तर: शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी शील, सत्यप्रियता, वाक्यचातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्यस्वप्न इत्यादी संस्कार केले.

( २ ) शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

उत्तर: मावळच प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीमुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

प्र.३. शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा.
उत्तर
: शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे:- येसाजी कंक, बाजी पासलकर, बापुजी मुद्गल, नऱ्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू, दादाजी नरसप्रभू देशपांडे इत्यादी

४. शोधा आणि लिहा .

( १ ) शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात ?

उत्तर: परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते.

( २ ) शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले ?

उत्तर: पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी , पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला . या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे , हे त्यांच्या लक्षात आले . त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले .

( ३ ) शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह का केला ?

उत्तर: शिवाजी महाराज आणि आदिलशाहीतील सरदार अफजलखान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली होती त्या दरम्यान अफजलखानने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला त्यात शिवाजी महाराजांनी त्याला ठार केले व आदिलशाहीचा तह झाला.

( ४ ) शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले ?

उत्तर: सिद्दींच्या सैन्यानी पाच महिने पन्हाळगडास वेढा दिला होता त्यामुळे महाराजांना बाहेर पडता येत नव्हते त्यांनी सिद्दीशी बोलणी करुन वेढा थोडा शिथिल करण्यात आला.याचा फायदा घेऊन मुख्य दरवाजाने महाराजांसारखा दिसणारा शिवा काशीद हा पालखीत बसून गेला या वेळी त्याला स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागले. शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. अशा प्रकारे शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले.

उपक्रम:

( १ ) तुम्ही पाहिलेल्या एखादया किल्ल्याचे वर्णन करा व ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याबाबत तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते सांगा .

( २ ) शेतीचा सात बारा ‘ ( ७/१२ ) उतारा मिळवून पाठातील शब्दांचा संबंध समजून घ्या .

Leave a Comment