तौलनिक साहित्याभ्यासाचे महत्वाचे परीक्षाभिमुख सराव प्रश्न. (NET EXAM २०२१)
१) “तौलनिक साहित्याभ्यास : तत्त्वे व दिशा” हा ग्रंथ कोणी संपादित केला.
उत्तर: चंद्रशेखर जहागीरदार
२) १९ व्या शतकात फ्रान्समध्ये जर्मन व फ्रेंच साहित्याचा तौलनिक अभ्यास कोणी केला ?
उत्तर: मादाम स्टेल
३) विविध भाषांमध्ये वाङ्मयीन आदानप्रदान व्हावे , यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी कोणती संस्था स्थापन केली ?
उत्तर: विश्वभारती
४) कालिदासाचे ‘ शाकुंतल ‘ आणि शेक्सपियरचे ‘ द टेम्पेस्ट ‘ या नाटकांचा तौलनिक अभ्यास कोणी केला ?
उत्तर: ह . ना . आपटे
५) भारतविद्या ( Indolojy ) ही ज्ञानशाखा कोणी सुरू केली ?
उत्तर: सर विल्यम जोन्स
६)तौलनिक साहित्याचा जनक कोणास म्हटले जाते?
उत्तर: जॉन ड्रायडन
७) ‘ साहित्य ही काळ , वंश आणि परिवेश यांची निर्मिती असते ‘ हा सिद्धान्त कोणी मांडला ?
उत्तर: हिपोलिट तेन
८) ‘ तौलनिक साहित्य ‘ या संज्ञेचा वापर सर्वप्रथम कोणी केला?
उत्तर: मॅथ्यू अर्नोल्ड
९). कालिदासाच्या ‘ अभिज्ञान शाकुंतलम् ‘ या नाटकाचा इंग्रजी अनुवाद कोणी केला ?
उत्तर: सर विल्यम जोन्स
१०) ‘ विश्वसाहित्य ‘ या संकल्पनेचा पुरस्कार सर्वप्रथम कोणी केला ?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
११) ‘ साहित्यनिर्मिती ही एकाच वेळी क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल असते ‘ , हे विधान कोणाचे ?
उत्तर: टी . एस . इलियट
१२) ‘KABIR AND HIS KABIRPANTH’ हा चरित्र ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर: जी.एच. वेस्टकोट
१३) ‘ THE LIFE OF TUKARAM’ हा ग्रंथ कुणी लिहिला?
उत्तर: जस्टीन .ई. अँबट
१४) भारतातील तौलनिक साहित्याभ्यासाला प्रारंभ कुणी केला?
उत्तर: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
१५) ‘ तौलनिक साहित्याभ्यास हा अनेक साहित्याधिष्ठित अभ्यास असतो ‘ हे विधान कोणी केले आहे ?
उत्तर: वसंत बापट
१६). भाषा , प्रदेश , देश , काल , संस्कृती यांच्या सीमा ओलांडून केलेल्या अभ्यासाला….. साहित्याभ्यास असे म्हणतात.
उत्तर: तौलनिक
१७) विश्वसाहित्याची, सर्वसमावेशकतेची संकल्पना कोणाच्या साहित्याभ्यासाच्या संकल्पनेत आहे .
उत्तर: चँडलर
१८) ‘ मराठी – हिंदी काव्यातील भक्तिविचार ‘ हा संशोधन विषय कोणत्या साहित्याध्यासात प्रकाशन येतो ?
उत्तर: तौलनिक
१९) जगामधील भटक्या जमाती कहाण्यांची आदानप्रदान करतात म्हणून त्यांना म्हणतात.
उत्तर: जिप्सी
२०) The Budhist Stories हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
उत्तर: र्ऱ्हीस डेव्हिडस
२१) फादर स्टीफन्स कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर: खिस्तपुराण
२२)’ सर्वश्रेष्ठ ज्ञानाची प्राप्ती तुलनेवरच आधारित आहे . हे मत कोणाचे आहे ?
उत्तर: मँक्समूलर
२३) व्यक्ती जीवन साहित्याचे क्षेत्र व राष्ट्रीय भावना विकसित करण्यात कोणत्या अभ्यासाचे योगदान महत्त्वाचे आहे ?
उत्तर: तौलनिक
२४) ‘ पंचतंत्राचा ‘ अरबीत कोणत्या नावाने अनुवाद करण्यात आला आहे .
उत्तर: कलीलह दिमनह