आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला इयत्ता पाचवी स्वाध्याय

धडा १. आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला

स्वाध्याय

काय करावे बरे?

अ) लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे . ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे . आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे . या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल?

उत्तर: १) अंतराळयानातील एखाद्या क्षेपणास्राने त्याला धक्का देऊन त्याची दिशा बदलता येईल. २) एखाद्या शक्तिशाली अवकाश यंत्राच्या सहाय्याने त्याचे तुकडे करता येतील. ३) खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल.४) आधुनिक तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे. जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपले खगोलशास्त्रज्ञ ती टक्कर नक्कीच टाळतील.

जरा डोके चालवा.

( १ ) सूर्य अचानक गडप झाला , तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल?

उत्तर: सूर्य अचानक गडप झाला, तर सगळीकडे अंधार होईल. २) दिवस-रात्र होणार नाही. ३) सूर्याचा प्रकाश न मिळाल्यास पृथ्वीवरील झाडे किंवा काही सजीव वस्तू नष्ट होतील. ४) सूर्याच्या उर्जेवर चालणारे यंत्र बंद पडतील. ५) पावसाळा-हिवाळा- उन्हाळा- हे ऋतूचक्र बंद होईल. ६) सूर्यप्रकाश न पडल्यामुळे सगळीकडे थंडीचे वातावरण निर्माण होईल. ७) आकाशगंगेतील ग्रहांचे चक्र कार्य बदलेल. ८) सूर्य हा आपल्या सृष्टीवरील एक महत्वाचा तारा आहे. संपूर्ण सृष्टी सूर्यावर अवलंबून आहे.

( २ ) असे समजा , की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे . तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला / तिला नीट कळले पाहिजे . तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल ?

उत्तर: त्रिवेणी, मुरबाड रोड, कल्याण (पश्चिम), ४२१३०१,

महाराष्ट्र राज्य, भारत देश , आशिया खंड, ग्रह ३ रा,

आकाशगंगा, सूर्यमाला.

 ३. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे , ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा .

वरील सूर्यमालेमध्ये ग्रह चुकीच्या क्रमाने लावलेले आहेत. हे चित्र पाठ्यपुस्तकातील आहे.
वरील चित्रात सूर्यमालेतील ग्रहांचा योग्यक्रम लावलेला आहे.

४. मी कोण?

( अ ) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता . तुम्हांला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो .

उत्तर: चंद्र

(आ) मी स्वयंप्रकाशी आहे . माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो.

उत्तर: सूर्य

(इ) मी स्वतःभोवती , ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो .

उत्तर: उपग्रह

(ई) मी स्वत : भोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

उत्तर: ग्रह

(उ) माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही.

उत्तर: पृथ्वी

(ऊ) मी पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा आहे.

उत्तर: सूर्य

प्र.५.(अ) अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात ?

उत्तर: १)पृथ्वीपासून दूर आकाशात असणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी संशोधन किंवा त्यांची माहिती मिळवण्यासाठी अवकाशात प्रक्षेपण करणयासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात. २) रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. पृथ्वीवरून वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द शक्ती द्यावी लागते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेटचा केला जातो.

( आ ) कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात ?

उत्तर: कृत्रिम उपग्रहांच्या साह्याने शेती , पर्यावरणाचे निरीक्षण , हवामान अंदाज , नकाशे तयार करणे , पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे इत्वयादीची माहिती मिळवता येते. तसेच संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केला जातो. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात . कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात.

 उपक्रम:

( १ ) अवकाश संशोधनासंदर्भात भित्तिपत्रके तयार करून त्यांचे शाळेत प्रदर्शन भरवा.

( २ ) सूर्यमालेतील कोणकोणत्या ग्रहांना उपग्रह आहेत याची माहिती मिळवा.

उत्तर:

Leave a Comment