धडा:२. बंडूची इजार : मराठी इयत्ता पाचवी स्वाध्याय

बंडूची इजार (चित्रकथा)

प्रश्न १. चर्चा करून उत्तरे लिहा.

अ) बंडूची इजार लांब झाली म्हणून कमी केली. जर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा.

उत्तर: जर ती आखूड झाली असती, तर १) तसाच नवीन कपडा घेऊन त्याला जोडला असता.२) कमरेतील कपडा उसवून थोड वाढवल असत.

आ) इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची?

उत्तर: इजारीची चड्डी झाली यात सर्वांची चूक आहे. कारण त्यांनी एकमेकांना न विचारता ४ बोट इजार कापली. प्रथम बंडूच्या बायकोने नंतर त्याच्या बहिणीने आणि शेवटी आईने अस करता करता इजार ची चड्डी झाली. परंतु चुकीही बंडूच्या बायकोची आहे.तिने घरात कुणाला न सांगता इजार कापली. त्यामुळे पुढे गोंधळ झाला.

इ) बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले, म्हणजे ‘पाय’ असणारी इजार सजीव आहे, असे आपण म्हणत नाही; पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा.

उत्तर:१) सुईचे -नाक, २)कपाचा-कान, ३)नारळाला-डोळे, ४) बाटलीचे-तोंड, ५)टेबलाचे पाय, ६)तव्याची-पाठ. इत्यादी

प्रश्न २. खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्ये पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा.

(कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड)

अ) चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती.

आ)कपाचा कान तुटला होता, म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला.

इ) ‘हा नारळ नासका निघणार,’ नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली.

ई) मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते.

उ) कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना.

ऊ) चरवीतले दूध गंजात ओतले, तर ते गंजाच्या गळा पर्यंत आले.

ए) सुईच्या नाक दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरु केली.

ऐ) आंब्यांच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला.

ओ) आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.

औ) खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता, म्हणून मी जमिनीवर बसलो.

Leave a Comment