इतिहास आणि कालसंकल्पना इयत्ता पाचवी स्वाध्याय

धडा २. इतिहास आणि कालसंकल्पना

स्वाध्याय

प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

( अ ) आपण वापरतो ती दिनदर्शिका …………वर आधारलेली असते .

उत्तर: आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावरआधारलेली असते .

 ( आ ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला …….. असे म्हटले जाते.

 उत्तर: इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला ‘इसवी सन पूर्व काळ’ असे म्हटले जाते.

प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

 ( अ ) कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो ?

उत्तर: कालमापन करण्यासाठी कर्ब-१४ विश्लेषण आणि काष्ठवलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो.

( आ ) इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो?

उत्तर: इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ “इ. स. पू. १००-१” असा लिहिला जातो.

प्र.३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय ?

उत्तर: १) वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. २) शंभर वर्षांचा काळ संपला की एक शतक होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली की एक सहस्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखीव विभागणी म्हणतात. ३) एकरेखीव विभागणीत एकापाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते.

आ) कालगणना करण्याची एकके कोणती?

उत्तर: “कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे.” कालगणना मोजण्याची एकके पुढीलप्रमाणे आहेत: सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्रक.

प्र.४.पुढील तक्ता पूर्ण करा . 

इतिहासाची कालविभागणी

 प्रागैतिहासिक काळ  ऐतिहासिक काळ
*इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही .* *इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे . *

उपक्रम:

दिलेल्या मासिक नियोजनानुसार स्वत: चे मासिक नियोजन तयार करा.

 फेब्रुवारी

रविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवार
      
५ क्रिकेटचा सामना८ गाण्याचा क्लास
९ मित्राचा वाढदिवस१०११आत्या येणार१२१३१४१५
१६१७१८ गणिताची चाचणी१९ छत्रपती शिवाजी महाराज जयंती२० आजीला भेटणे२१22 गाण्याचा क्लास
२३२४ गावची जत्रा२५२६२७मराठी भाषा गौरवदिन२८ 

हे तुम्हांला माहीत आहे का ?

Leave a Comment