धडा १: इतिहास म्हणजे काय?
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
( अ ) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ……….. म्हणतात .
उत्तर : भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ‘इतिहास’ म्हणतात .
( आ ) इतिहास केवळ ……………… आधारे लिहिला जात नाही .
उत्तर: इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही .
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
( अ ) शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ?
उत्तर: प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही, हे ठरवण्याच्या पद्धतीला ‘शास्त्रीय पद्धत’ असे म्हणतात.
( आ ) स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे ?
उत्तर: स्वतंत्रप्राप्ती हि घटना स्वतंत्रलढा या कृतीचा परिणाम आहे.
( इ ) इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते ?
उत्तर: इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ठ काय आणि अनिष्ठ काय, यांचा अभ्यास करणे शक्य होते.
३.पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते ?
- उत्तर: १)भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते.त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्रांपेक्षा वेगळी आहे.२) त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. ३) त्यासाठी आवशक्यता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते.४) इतिहास हा केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. म्हणून वरील बाबी विचारात घेतल्यास घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे.
(आ ) गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात ?
- उत्तर: १) गावातील लोकांचमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही, तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. २) माणसाच्या व्यक्तिगत आणि सामिहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते.
४. संकल्पनाचित्र तयार करा .
उत्तर:

५. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा .
इतिहासाची साधने – नाणी , पत्रव्यवहार, किल्ले , जात्यावरील ओव्या , भांडी , ताम्रपट , वाडे , शिलालेख , लोकगीते , स्तंभ , चरित्रग्रंथ , लेणी , लोककथा .
| भौतिक | लिखित | मौखिक |
| नाणी, वाडे, भांडी, शिलालेख, किल्ले, स्तंभ, लेणी. | चरित्रग्रंथ , पत्रव्यवहार | लोककथा, लोकगीते, जात्यावरील ओव्या. |
उपक्रम
( अ ) तुमच्या गावातील / परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची आणि प्राचीन धार्मिक स्थळांची माहिती व चित्रे संकलित करा.
- तुमच्या शाळेचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर कराल , याची यादी तयार करा व साधनांवरून तुम्हांस कोणती माहिती मिळू शकेल ते लिहा.
जसे शाळेची कोनशिला:- शाळेची स्थापना, उद्घाटक इत्यादी.
पुरातत्त्व
विविध मानवी समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष ठिकठिकाणी पहायला मिळतात . त्यांतील सर्वच जमिनीवर असतात असे नाही . वर्षानुवर्षे पुराने वाहून आणलेल्या गाळाचे किंवा वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली काही अवशेष गाडले जातात . मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेलेले असतात . अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात . ‘ पुरा ‘ म्हणजे जुने.
भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे , घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रास ‘ पुरातत्त्व शास्त्र असे म्हणतात . पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्यांचा अभ्यास करण्याचे काम पुरातत्त्वज्ञ करतात . जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एकेक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत , काळजीपूर्वक रीतीने खणण्याला पुरातत्त्वीय उत्खनन ‘ असे म्हणतात . पुरावशेष जिथे सापडू शकतील , अशा स्थळांचा शोध प्रथम घेतला जातो . त्यांची व्यवस्थित नोंद केली जाते . त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचे याचे नियोजन केले जाते.
उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करत असताना पुरातत्त्वज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात.
उदाहरणार्थ,
१. मिळालेले अवशेष कोणत्या काळातील आहेत ?
२. ते अवशेष कोणत्या संस्कृतीचे आहेत ?
३. त्या संस्कृतीमधील लोकांचे दैनंदिन जीवन कशा प्रकारचे होते ?
४. त्या लोकांचे इतर संस्कृतींमधील लोकांशी कशा प्रकारचे संबंध होते ?
५. त्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी ते भोवतालच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कसा करून घेत होते ?