इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय

धडा २. इतिहासाची साधने

स्वाध्याय

प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा .

१ ) लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जातो?

उत्तर: सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे.

२) वेदवाङ्मयातून कोणती माहिती मिळते ?

उत्तर: इ.स.पू.१५०० पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातुन मिळते.

३) मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे?

उत्तर: मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी.साहित्य जे लिहून ठेवलेले नसते. असे साहित्य जतन करून ठेवले आहे.

प्र.२. खालील साधनांचे भौतिक , लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा.

ताम्रपट , लोककथा , मातीची भांडी , मणी , प्रवासवर्णने , ओवी , शिलालेख , पोवाडा , वैदिक साहित्य , स्तूप , नाणी , भजन, पुराणग्रंथ .

भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने
मातीची भांडी पुराणग्रंथ लोककथा
मणी वैदिक साहित्य ओवी
नाणी शिलालेख पोवाडा
स्तूप प्रवासवर्णने भजन

प्र.३. पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा.

प्र.४. कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा .

नाण्यावरील मजकूर , वापरलेला धातु , नाण्यावरील वर्ष, नाण्यावरील चिन्ह , नाण्यावरील चित्र , भाषा , वजन, आकार, किंमत.

नाण्यावरील मजकूर वापरलेला धातु नाण्यावरील वर्ष
सत्यमेव जयतेस्टील2019
नाण्यावरील चिन्ह नाण्यावरील चित्र भाषा
अशोकस्तंभकमळफुल व त्याच्या कळीचा वेल संस्कृत
वजन आकारकिंमत
3.09 ग्रॅमगोल१ रुपया

प्र.५. कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत ? त्यांचे गटात सादरीकरण करा .

उदा . कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी.

उत्तर: पौराणिक देवदेवतांच्या कथा, लोकगीते, आजीच्या भुताच्या गोष्टी, भजन, कीर्तन.इत्यादी.

उपक्रम

भौतिक , लिखित साधनांची चित्रे जमवा व त्या चित्रांचे प्रदर्शन बालआनंद मेळाव्यात भरवा .

Leave a Comment