पृथ्वीचे फिरणे: इयत्ता पाचवी स्वाध्याय.

परिसर भाग १. धडा.२. भूगोल इयत्ता पाचवी

प्र.१ . काय करावे बरे ?

१)अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे . आजीला थंडीचा त्रास होतो , तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे ?

उत्तर: ऑस्ट्रेलिया हा दक्षिण गोलार्धातील देश असल्यामुळे २२ मार्च ते २३ सप्टेंबर दरम्यान तिथे थंडीच वातारण असते. आणि अमितच्या आजीला थंडीचा त्रास आहे म्हणून अमितने आपल्या आजीला २३ सप्टेंबर ते २२ मार्च या काळात ऑस्ट्रेलिया घेऊन जाता येईल कारण याकाळात तिथे उन्हाळ्याचे दिवस असतात.

प्र.२. जरा डोके चालवा .

( अ ) पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात ?

उत्तर: पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन एक रात्र असे भाग असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात ३६५ दिवस आणि ६ तास असतात. म्हणजेच एका परिभ्रमणात पृथ्वी ३६५ / परिवलने करते.

( आ ) अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे . पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा. ( मुंबई ( महाराष्ट्र ) , कोलकता ( पश्चिम बंगाल ) , भोपाळ ( मध्यप्रदेश ) , नागपूर ( महाराष्ट्र ) .

उत्तर: १) इटानगर (अरुणाचल प्रदेश) २) कोलकाता (पश्चिम बंगाल) ३) भोपाळ (मध्यप्रदेश) ४) नागपूर (महाराष्ट्र) ५)मुंबई (महाराष्ट्र).

प्र.३. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

( अ ) पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास……… म्हणतात.

उत्तर: पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात.

( आ ) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास……… म्हणतात.

उत्तर: पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात.

( इ ) पृथ्वीच्या परिवलनामुळे …….व ……होते.

उत्तर: पृथ्वीच्या परिवलनामुळे दिनरात्र होते.

प्र.४.कशाला काय म्हणतात ?

अ) पौर्णिमा

उत्तर: पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमा किंवा पौर्णिमेची रात्र असे म्हणतात.

आ) अमावस्या

उत्तर: पृथ्वीवरून च्नाद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही तेव्हा त्याला अमावस्या किंवा अमावस्येची रात्र म्हणतात.

इ) चांद्रमास

उत्तर: एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येचा काळ सुमारे २८ ते ३० दिवसांचा असतो. या काळालाच चांद्रमास म्हणतात.

ई) तिथी

उत्तर: चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला ‘तिथी’ म्हणतात.

प्र.५ प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) विषुववृत्त म्हणजे काय?

उत्तर: उत्तर आणि दक्षिण धृवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात.

आ) विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते?

उत्तर: विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

सतत विचारण्यात आलेले प्रश्न.

१)पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात.

उत्तर: पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात.

२) विषुववृत्तामुळे कोणते दोन गोलार्ध तयार होतात.

उत्तर: उत्तर आणि दक्षिण असे दोन गोलार्ध तयार होतात.

३) पृथ्वीच्या परिवलनामुळे ….. होते

उत्तर: दिवस आणि रात्र होते.

४) अक्षवृत्त म्हणजे काय

उत्तर: आकृत्यांमध्ये जरी या रेषा लंबवर्तुळ दिसत असल्या तरी पृथ्वीगोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात. या वर्तुळाना अक्षवृत्त असे म्हणतात.

अ) विषुववृत्त म्हणजे काय?

उत्तर: २३० ३०’ दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात.

!!धन्यवाद!!

Leave a Comment