धडा.३. पृथ्वीवरील सजीव
स्वाध्याय
प्र.१.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
( अ ) एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते ?
उत्तर: एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते.
( आ ) एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले ?
उत्तर: एकपेशीय सजीव हे प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले.
प्र.२.पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .
( अ ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले ?
उत्तर: सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला , एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला . त्याच्या अत्यंत वेगवान , चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले .
( आ ) प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा .
उत्तर: १) प्राणी श्वासोच्छ्वास करतात . २) प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात . ३) काही प्राणिजातीमधील प्राणिजातीमधील प्राणी अंडी घालतात . त्यातून पिल्ले जन्माला येतात . काही प्राणिजातीमधील प्राणी अपत्याला ही जन्म देतात .
प्र.३. पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्यांभोवती गोल करा .

प्र.४. पुढील घटना कालक्रमाने लिहा.
अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली .
( आ ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले .
( इ ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले .
( ई ) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला .
उत्तर:
योग्य घटनाक्रम :
१)तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला .
२) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले .
३)पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली .
४) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले .
उपक्रम
जवळच्या प्राणिसंग्रहालयास भेट दया किंवा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांची यादी करा व त्यांची वैशिष्ट्ये लिहा .
हे तुम्हांला माहीत आहे का ?
पृथ्वीखेरीज ‘ मंगळ ‘ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना वाटत आलेली आहे . असे असले , तरी त्याविषयीचे निश्चित तथ्य अजून पुढे आलेले नाही . पृथ्वीप्रमाणेच मंगळाच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी पर्वत , दया , वाळवंट आणि बर्फाने आच्छादित असणारे ध्रुवीय प्रदेश आहेत . तेथील कर्ब – द्विप्राणील वायूचे ( कार्बन डायऑक्साईड ) प्रमाण जवळजवळ ९ ५ % आहे . मंगळावर पाणी , अतिसूक्ष्म प्रमाणात प्राणवायू आणि इतर काही वायू यांचे अस्तित्व आढळल्यामुळे तेथे सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता पुढे आली . तेथील मातीमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक उपस्थित असल्याचेही आढळले आहे . हे सर्व लक्षात घेऊन मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाबाबत शास्त्रीय संशोधन सुरू आहे . सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी द्रवरूप पाण्याची आवश्यकता असते . मंगळाचा ध्रुवीय प्रदेश बर्फाने आच्छादलेला असला , तरी तिथे द्रवरूपातील पाणी फारसे नाही . साहित्य आणि चित्रपट यांच्याद्वारे मंगळावरचा माणूस ‘ ही कल्पना खूप लोकप्रिय झाली , परंतु आतापर्यंतच्या शास्त्रीय संशोधनातून त्या कल्पनेला पुष्टी मिळालेली नाही . ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताने अवकाशात मंगळयान पाठवले आणि ही मोहीम २४ सप्टेंबर २०१४ रोजी यशस्वी झाली . ही एक ऐतिहासिक घटना आहे .