सामान्य ज्ञान GK- २०२१ (मराठी)

सामान्य विज्ञानावरील महत्वाचे प्रश्न जे स्पर्धात्मक परीक्षामध्ये विचारले जातात.

१) नैसर्गिक संसाधने कोणती?
उत्तर
: हवा,पाणी व जमीन ही नैसर्गिक संसाधने आहेत.

२)वातावरणाचे पाच थर कोणते?
उत्तर
: तापांबर, स्थितांबर, दलांबर, आयांनाबर आणि बह्यांबर

३)वातावरणाच्या हवे मध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो?
उत्तर
: नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, सहा निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड, पाण्याची वाफ, धुलीकण यांचा समावेश होतो.

४)नायट्रोजनचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो, अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.

५)ऑक्सिजनचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे.

६)कार्बन डायॉक्साइडचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात, अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात.

७)अरगॉनचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

८) हेलिअमचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो.


९) निऑनचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: जाहिरातींसाठी रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

१०) क्रिप्टॉनचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो.

११)झेनॉनचा वापर कशासाठी होतो?

उत्तर: फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग येतो.

१२) ओझोनचे सूत्र सांगा?

उत्तर: ०

१३) ओझोन संरक्षण दिन केव्हा मानला जातो.

उत्तर: १६ सप्टेंबर

१४) ओझोनच्या थराचा नाश कसा होतो?
उत्तर
: क्लोरोफ्लुरोकार्बन्स व कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेमध्ये मिसळल्याने नाश होतो.

१५) पाण्याची निर्मिती कशी होते.
उत्तर
: हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते.

१६) पृथ्वीवर पिण्यासाठी योग्य पाणी % आहे.
उत्तर
: ०.३% पाणी पृथ्वीवर पिण्यासाठी योग्य आहे.

१७)भारतीय हवामानशास्त्र संस्था केव्हा स्थापन झाली.
उत्तर
: १८७५ साली

१८)परिपक्व मृदा तयार होण्यास किती कालावधी लागतो.
उत्तर
: २.५ सेमीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्ष कालावधी लागतो.

Leave a Comment