धडा .४. सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१)कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला?
उत्तर: कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला.
२)कविताला कशामुळे दिलासा मिळाला?
उत्तर: कविताचे सुवर्णपदक काही सेकंदाने हुकले तेव्हा निराश असतांनी आईने समजूत काढली तेव्हा आईच्या त्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला.
३)कविताचे पाय कशामुळे कणखर बनले बनले?
उत्तर: कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले.
४) कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले?
उत्तर: नाशिक येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने प्रथम क्रमांक पटकावला. तेव्हा विजेंद्र सिंग यांनी कविताचे वेगळेपण ओळखले.
५)कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही?
उत्तर: कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटेल.
६)कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते?
उत्तर: कविता पी. टी. उषा या धावपटूला आदर्श मानते.
७)कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते?
उत्तर: कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
प्रश्न २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
१)कविता राऊतला ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ का म्हणतात?
उत्तर: कविता राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धातून अंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावारूपास आली. या दोन्हीही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावले. सावरपाडासारख्या दुर्गम भागाचे नाव उंचावले म्हणून तिला “सावरपाडा एक्सप्रेस”असे म्हणतात.
२)कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली?
उत्तर: कविताला पुढील शिक्षणासाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला परंतु ती राहणार कुठे ? हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला व पुढील पाच वर्षे ती त्यांच्याच घरी राहू लागली.
३)हरसूल, सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो?
उत्तर: कविताच्या यशामुळे हरसूल, सावरपाडा या भागास नवीन ओळख मिळाली म्हणून त्यापरिसरारील लोकांना तिचा अभिमान वाटतो.
४)आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईना का वाटते?
उत्तर: लेकिभोवती निर्माण झालेली वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा पाहून सुमुत्राबाईना आपली लेक खूप मोठी झाली आहे असे वाटते.
५)कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात?
उत्तर: कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग कारण, जेव्हा कविता प्रतिकूल परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मिळावी म्हणून जो भेटेल, त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कमीपणा वाटू दिला नाही.
६)कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल?
उत्तर: जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढत मेहनत करत रहाणे. हि प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ.
प्रश्न ३. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा.
सोडवलेल:
उदा.अ) पण- वेगळेपण-लहानपण इ) पणा- कमीपणा-मोठेपणा
उ) इक – आर्थिक-कार्तिक
आ) दार- चमकदार-उबदार ई) पणी- लहानपणी- म्हातारपणी
उ) इत- अखंडित-पंडित
प्रश्न ४. खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा.
१) दिलासा मिळणे.
उत्तर: रामूला शाळेतील वार्षिक फी भरण्यासाठी मित्राने वेळेवर आर्थिक मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला.
२)गराडा पडणे.
उत्तर: आमीर खान गावात येताच त्याच्याभोवती लोकांचा गराडा पडला.
३)कणखर बनणे.
उत्तर: कविताचे रोज विहिरीवरून अनवाणी पाणी वाहून पाय कणखर बनले.
४)ओढाताण होणे.
उत्तर: राजू आणि चिकूची नवीन रीमोट कारसाठी ओढाताण चालू झाली.
५)नात्यातील वीण गहिरी असणे.
उत्तर: कविता आणि सविता यांच्या मैत्रीच्या नात्यातील वीण गहिरी आहे.
६)वणवण सहन करणे.
उत्तर: विकासला स्वतःचे पोट भरण्यासाठी वणवण सहन करावी लागते.
प्रश्न ५. समान अर्थाचे शब्द लिहा.
उत्तर:
१)माय- आई
२)लेक- मुलगी
३)बळ- शक्ती
४)गहिरे- खोल
५)क्रीडा- खेळ
६)वडील- बाप
प्रश्न ६. तुम्हांला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो ? तो का आवडतो?
उत्तर:
प्रश्न ७. तुम्हांला मैदानी खेळ आवडतात, की बैठे खेळ ? की दोन्ही ? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा.
उत्तर:
प्रश्न ८. खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या शब्द समूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दांत सांगा.
तुमची गल्ली/ गाव कशाने वेढलेले आहे?
उत्तर: गल्ली/ गावभोवती काय आहे.
आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत.
उत्तर: शहरांमध्ये धूराचे/प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे.
अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत.
उत्तर: सिमेंटच्या इमारतींनी वेढलेली आहेत.
कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात.
उत्तर: अनिताबाईंच्या टेबलावर खूप फाइली असतात.
प्रश्न ९. शरीर या शब्दापासून ‘शारीरिक’ हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या.
उद्योग- औद्योगिक, शिक्षण- शैक्षणिक, बुद्धी- बौद्धिक, नीती-नैतिक, संस्कृती-सांस्कृतिक, भूगोल-भौगोलिक, इतिहास-ऐतिहासिक, विज्ञान-वैज्ञानिक.
प्रश्न १०. दिलेल्या मुद्यांच्या आधारे ‘क्रीडामहोत्सव’ या विषयावर आठ ते दहा वाक्ये लिहा.
महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका/जिल्हा/राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पहातांना मनात आलेले विचार.
उपक्रम:
१. तुम्हांला माहित असलेल्या धावपटूंची नावे लिहा. त्यांनी जिंकलेल्या स्पर्धा व पदके यांची माहिती घ्या. त्यांची चित्रे जमवा.
२. खालील प्रकारे सारणी तयार करून वहीत जास्तीत जास्त नावे लिहा.
| बैठे खेळ | मैदानी खेळ |
| पत्ते,बुद्धीबळ, सापशिडी, लुडो. | खो-खो, कब्बडी, धावणे, कुस्ती, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, गोळाफेक, भालाफेक. इत्यादी. |
३. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा यांची खालील मुद्यांच्या आधारे शिक्षकांकडून माहिती मिळावा. मिळवलेल्या माहितीवर मित्रांशी चर्चा करा.
अ) स्पर्धा भरवण्याचा कालावधी.
आ) समाविष्ठ क्रीडा प्रकार.
इ) विजेत्या खेळाडूस किंवा संघास दिली जाणारी पारितोषिके.
४. या स्पर्धामधील काही खेळाडूंची चित्रे, वर्तमानपात्रांतील स्पर्धासंदर्भातील बातम्या, कात्रणे, खेळांची क्षणचित्रे मिळवून त्यांचा संग्रह तयार करा.
५. वाचा. चर्चा करा. माहिती मिळवा.
पाण्यासाठी वणवण भटकावे लागणे ही चांगली बाब नाही. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. मित्र, शिक्षक, कुटुंबातील व्यक्ती, गावातील लोक यांच्याशी पुढील मुद्यांवर चर्चा करा.
तुमच्या गावातील पाण्याच्या साठ्यांचे प्रकार.
तुमच्या गावात पाणीटंचाई असल्यास त्यांची कारणे. पाणीटंचाई नसल्यास त्यांची करणे.
कविता राऊतप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन घडलेल्या एखाद्या व्यक्ती विषयी माहिती मिळवा व लिहा.
आपण समजून घेऊया. (व्याकरण)
नाम
माधव आणि सरिता शाळेत निघाले. सरिताने पाण्याची बाटली दफ्तरात ठेवली अन् मांजराला टाटा करून ती निघाली.
वरील उदाहरणात माधव, सरिता ही व्यक्तींची नावे आली आहेत. पाणी हे द्रवाचे नाव आहे, तर बाटली, दप्तर ही वस्तूंची नावे आहेत. मांजर हे प्राण्यांचे नाव आहे. या नावांना नाम म्हणतात.
आपण वस्तू हा शब्द डोळ्याने दिसणाऱ्या, पदार्थाला किंवा त्यांच्या गुंणधर्माना उद्देशून वापरतो. वस्तू या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी असणारे गुणधर्म, भाव-भावना यांचा अंतर्भाव होतो.
खालील वाक्यांतील अधोरेखित केलेली नामे वाचा व समजून घ्या.
शब्बीर खाली बसला.
पाऊस कमी झाला.
तो शाळेत येऊन सुरवाडेगुरुजींना म्हणाला .
पाकिटात पैसे नव्हते.
मुले बागेतील फुलेफळे जपू लागली .
कविता राऊतमुळे हरसूलपाड्याला आनंद झाला .
( शब्बीर, पाऊस, शाळा, सुरवाडेगुरुजी, पाकीट, पैसे, मुले, बाग, फुलेफळे, कविता, राऊत, हरसूलपाडा, आनंद ही नामे आहेत.)
वरीलप्रमाणे नामे वापरून पाच वाक्ये लिहा .
उत्तर:
१) शब्बीर रोज व्यायाम करतो.
२) मी रोज शाळेत जाते.
३) श्रद्धाला वाचन करायला आवडते.
४) आज शाळेला सुट्टी आहे.
५) आई आणि मी मामाच्या गावाला जाणार आहोत.
या पाठातील नामांची यादी करा.
व्यक्ती, प्राणी, पक्षी, कीटक, वस्तू, पदार्थ, फळे, फुले, गावे, नया, गुण या प्रत्येक प्रकाराची दहा नावे गटात चर्चा करून लिहा.
वर्गातील विदयार्थ्यांचे दोन गट करावे. एका गटाने नाव सांगावे. सांगितलेल्या नावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारे नाव दुसऱ्या गटाने सांगावे. अशा पद्धतीने नावांच्या भेंड्यांचा खेळ खेळावा.
उदा. माधव → वजन → नमिता तारीख → खाऊ → ऊस → सर्कस …..
शिक्षकांसाठी: विदयार्थ्यांना नामांची विविध उदाहरणे दयावी. विदयार्थ्यांना नामे सांगायला लावावी. त्यांच्याकडून नामाची व्याख्या करून घ्यावी. विविध नामांचा उपयोग करून विदयार्थ्यांकडून वाक्ये तयार करून घ्यावी. नावांच्या भेंड्यांचा खेळ घ्यावा.