युरोप आणि भारत: इयत्ता आठवी स्वाध्याय.

धडा.२. युरोप आणि भारत

प्र.१.दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .

१ ) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी ……….हे शहर जिंकून घेतले.

उत्तर: इ.स .१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले.

अ ) व्हेनिस ( ब ) कॉन्स्टॅन्टिनोपल ( क ) रोम ( ड ) पँरिस

२ ) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ…… झाला.

उत्तर: ( २ ) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लड झाला.

अ ) इंग्लड ब) फ्रान्स ( क ) इटली ( ड ) पोर्तुगाल


३ ) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ……याने केला.


उत्तर: इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासीम याने केला.

अ ) सिराज उद्दौला ब ) मीर कासीम ( क ) मीर जाफर ( ड ) शाहआलम


प्र. २. पुढील संकल्पना स्पष्ट करा .
१ ) वसाहतवाद

उत्तर: “एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखादया विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय” . आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच ‘ वसाहतवाद ‘ होय.
२ ) साम्राज्यवाद

उत्तर: साम्राज्यवाद : विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच ‘ साम्राज्यवाद ‘ होय.

३ ) प्रबोधनयुग

उत्तर: प्रबोधनयुग : युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते . कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला . म्हणूनच या काळाला ‘ प्रबोधनयुग’ असे म्हणतात.

४ ) भांडवलशाही

उत्तर:


प्र.३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा .


१ ) प्लासीच्या लढाईत सिराज उददौलाचा पराभव झाला.

उत्तर: १) इ.स.१७५६ साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला . ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करत. २) इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली . यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली . या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला . ३) रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. ४) इ.स.१७५७ मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली . परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला.


२ ) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.

उत्तर: १) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल ( इस्तंबूल ) जिंकून घेतले.२) त्यानंतर या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात होते. ३) तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.


३ ) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.

उत्तर: १)नवीन सागरी मार्गांचा शोध लागला आणि युरोप आणि आशियाई देशातील व्यापाराला सुरवात झाली.२) पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले.मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते.त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयाला आल्या. ३)पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. ४)या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.

प्र.४. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.

दर्यावर्दीकार्य
बार्थोलोम्यू डायसआफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला.
ख्रिस्तोफर कोलंबसअमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहचला.
वास्को-द-गामाभारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला.

Leave a Comment